चाकरमानी कोरोनाच्या चक्रव्यूहात गावात 10 दिवस तर पुन्हा नोकरी च्या गावात 14 दिवस क्वारंटाईन ; आधी चाचणी मगच कोकणात प्रवेश शासनाचा निर्णय

0
123

 

प्रतिनिधी / प्रसाद गांधी.

पोलादपूर : १३ते २१ऑगस्ट दरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी शासनाच्या निर्देशानुसार एसटी बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. मात्र, सदर प्रवासापूर्वी संबंधित प्रवाशांनी कोविड – 19 ची चाचणी (RT- PCR Swab Test ) करणे अनिवार्य असून सदर चाचणी निगेटिव्ह (नकारात्मक ) असल्यास संबंधितांना प्रवास करता येईल, अशी अट ठेवण्यात आली आहे. तर गावात येणाऱ्या चाकरमानी यांना गावात 10 दिवस क्वांरटाईन तर परत नोकरीच्या ठिकाणी म्हणजे मुंबई पुन्हा 14 दिवस क्वांर टाईन राहावे लागणार असल्याने चाकरमानी कोरोनाच्या पाश्वभूमीवर स्वाभिमानी कोकणी माणूस चक्रव्यूहात अडकले आहे.
यासाठी गणेशोत्सव साठी गावी येणारे लाखो चाकरमानी विविध पर्याय वर मात करत मुंबई, ठाणे, पालघर या विभागा सह पुणे पिंपरी चिंचवड आदी गावातून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात लाखो चाकरमानी दाखल होत असतात मात्र मुंबई ठाणे पालघर मध्ये कोरोनाची संख्या जास्त असल्याने चाकरमानी याच्या मुले गावात त्याचा संसर्ग होऊ नये या साठी मुंबई, ठाणे, पालघर विभागातील बस स्थानकात चाकरमानी याची टेस्ट करण्यात येणार असून त्याचा खर्च चाकरमानी याच्या खिशातून जाणार आहे रिपार्ट निगेटिव्ह आला तर पुढचा प्रवास करत येणार आहे मात्र रिपार्ट पॉझिटिव्ह आला तर त्यास प्रवास करत येणार नाही त्यांनी आगाऊ बुकिंग केले असले तर ते वाया जाण्याची भीती अनेक चाकरमानी व्यक्त करत आहेत.
चाकरमानी याच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन नेहमी प्रमाणे सज्ज झाली असली तर तुघलकी अटी व शर्ती घातल्या असल्याने चाकरमानी त्रस्त झाले आहेत ई पास नको, पण कोविड टेस्ट निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट आणा असा आदेश महामंडळाने काढला आहे. त्यामुळे कोविड-19 च्या टेस्टसाठी चाकरमान्यांना काही हजार मोजावे लागणार आहेत.
या शिवाय या काळात कोकणात येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स व खाजगी गाड्यांनी येणाऱ्या चाकरमान्यांना देखील कोरोना टेस्ट सक्तीची करण्यात आली आहे टेस्टचा रिपोर्ट दाखविल्याशिवाय त्यांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात येणार नाही. आदी अडचणी चाकरमानी याच्या प्रवासावर गणेशोत्सवच्या सना वर घालण्यात आल्यावर चाकरमानी संताप व्यक्त करत आहेत परराज्यातील अनेक नागरिक राज्यात येतात जातात त्याची टेस्ट होत नाही मात्र चाकरमानी यांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागत आहे
गणपती सना नंतर पुन्हा मुंबई परतणाऱ्या चाकरमानी यांना मुंबई महानगरपालिका याच्या 14 दिवसाच्या होमक्वांरटाईन ला सामोरे जावे लागणार असून चाकरमानी यांना पाच दिवसाच्या गणपती साजरा करण्यासाठी 24 दिवस एकाच खोलीत किंवा घरात बंदिस्त राहावे लागणार आहे जवळपास अनेक चाकरमानी यांना 1 महिना सुट्टी घ्यावी लागणार आहे काहींनी ती घेत गावी आले तर काही जण अध्याप गावात पोहचण्यासाठी निघत आहेत.
इ पास तातडीने देण्यात यावे अशा सूचना प्रशासनाने दिले असले तरी अनेकदा कागद पत्राची पूर्तता करताना उशीर होणे वैद्यकीय प्रमाण पत्र आधारकार्ड लोड करताना नेटवर्क चा त्रास जाणवत असल्याने अनेक चाकरमानी एसटी चा सुखरूप प्रवास कडे वळत आहेत मात्र तिथे त्यांना टेस्ट च्या नियमातून जावे लागणार आहे.

*दखल न्यूज भारत*