जिल्ह्यात २४ तासांत १०१ कोरोनाबाधित तर, 3 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू

0
256

 

प्रतिनिधी / निलेश आखाडे.

रत्नागिरी : २४ तासात १०१ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २३९१ झाली आहे. आज जिल्हा शासकीय रुग्णालय येथून ३, संगमेश्वर १, कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण २, कोव्हीड केअर सेंटर घरडा ५, कोव्हीड केअर सेंटर पेढांबे चिपळूण १४, कोव्हीड केअर सेंटर रीम्झ हॉटेल १ अशा २६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. होम आयसोलेशनमध्ये असलेले ३ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा संख्या आता १५९७ झाली आहे.
*रुग्णांचे विवरण*
रत्नागिरी -४६
दापोली-८
खेड-६
चिपळूण-२७
अँटीजेन-१४
आज प्राप्त माहितीनुसार 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यु झाला आहे. खेड तालुक्यातील पुरेखुर्द येथील 49 वर्षीय जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे मृत्यु झाला. चाकाळे ता.खेड येथील 66 वर्षाच्या रुग्णांचा रत्नागिरी येथे दाखल करण्यास आणत असताना प्रवासादरम्याने मृत्यू झाला. हर्णे ता. दापोली येथील 70 वर्षीय रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या आता 83 झाली आहे.

*दखल न्यूज भारत*