Home चंद्रपूर  अजय दुबे पत्रकार यांच्या जन्मदिना निमित्त पुरोगामी पत्रकार संघाने दिल्या शुभेच्छा

अजय दुबे पत्रकार यांच्या जन्मदिना निमित्त पुरोगामी पत्रकार संघाने दिल्या शुभेच्छा

179

 

शंकर महाकाली
दख़ल न्यूज़ भारत
बल्लारपुर तालुका प्रतिनिधि
📲 8855043420

बल्लारपूर :- दैनिक भास्कर चे तालुका प्रतिनिधी,भाजप कामगार मोर्चा चे राज्य महासचिव कामगार नेते अजय दुबे यांच्या जन्मदिनी पुरोगामी पत्रकार संघ बल्लारपूर तालुक्याच्या वतीने त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
पुरोगामी पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर यांच्या नेतृतात जिल्हा संपर्क प्रमुख सुजय वाघमारे यांच्या सुचने नुसार अजय दुबे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.पत्रकार अजय दुबे हे गेली अनेक वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय असून,भाजप कामगार संघटनेचे राज्य सचिव झाल्या पासून त्यांनी कामगारांच्या अनेक समस्या निकाली काढल्या आहेत.त्याच बरोबर त्यांचा पत्रकारितेत सक्रिय सहभाग असल्याने त्यांनी आजवर न्याय संगत पत्रकारिता केली आहे.

पुरोगामी पत्रकार संघ कोणतेच हेवेदावे न ठेवता पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठो भांडणारे एकमेव संघटन असून,पत्रकार कोणत्याही संघटनेतील असला तरी त्याचा सन्मान करण्याची वैचारिक भूमिका पुरोगामी पत्रकार संघाची असल्याने त्याच वैचारिक भूमिकेतून अजय दुबे यांचा आज गौरव करण्यात आला.

यावेळी बल्लारपूर तालुक्यातील पुरोगामी पत्रकार संघाचे कार्यध्यक्ष विकास दुपारे,सचिव शंकर महाकाली,उपाध्यक्ष आरिफ खान,कोषाध्यक्ष गौतम कांबळे,प्रसिद्धी प्रमुख रिकी कांबळे उपस्थित होते.सर्व पदाधिकाऱ्यांनी दुबे यांचे अभिष्टचिंतन करत त्यांना भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.

Previous articleश्री स्वामी चुक्कावार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चामोर्शी तालुका सचिव पदी निवड आमदार श्री मा.धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्ती
Next articleरानभाजीच्या वितरण व्यवस्थेसाठी स्वतंत्र बाजारपेठ उभारू : खासदार धानोरकर एक दिवसीय रानभाजी महोत्सव संपन्न