अहेरी येथे विश्व हिंदू परिषदेचा स्थापना दिवस साजरा

114

 

प्रतिनिधी/रमेश बामनकर

गुड्डीगुडम : विश्व हिंदू परिषद स्थापना दिवस ”गोकुळाष्टमी”निमित्ताने विश्व हिंदू परिषद अहेरी जिल्हा तर्फे अहेरी येतील “*समर्पन*” संघ कार्यालयात भगवान श्रीकृष्ण ह्यांच्या प्रतिमेचे पूजन करून कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर साद्या पद्धतीने आज साजरा करण्यात आला..!!
अहेरी शहरात दरवर्षी विहिंप स्थापना दिवस गोकुळ अष्टमीला बजरंग दल अहेरी जिल्हा तर्फे भव्य दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते, परंतु ह्यावर्षी कोरोना संकटात तो कार्यक्रम न घेता साध्या पध्दतीने स्थापना दिवस साजरा करण्यात आला, ह्यावेळी विहिंप अहेरी जिल्हा महामंत्री अमित बेझलवार, भाजपा जिल्हा सचिव संदीप कोरेत, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गुडेल्लीवार,विहिंपचे अहेरी नगरमंत्री सचिन येरोजवार सह विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.