डिजिटल मीडियातून वनजमीन अतिक्रमण पर्दाफाश करणाऱ्या प्रतिनिधीच्या पाठीशी खंबीर – पुरोगामी पत्रकार संघ अरुण मादेशवार यांना मारहाण करणाऱ्या गावगु़ंडावर कठोर कारवाईची मागणी बल्लारपुर पोलीस निरीक्षकाना पुरोगामी पत्रकार संघाचे निवेदन

116

शंकर महाकाली
दख़ल न्यूज़ भारत
बल्लारपुर तालुका प्रतिनिधि
📲 8855043420

बल्लारपुर :- जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात ग्रामीण भागात राहून डिजिटल मिडियातून अनेक घटनांना वाचा फोडण्याचे प्रामाणिक काम करुन जनतेला न्याय देण्याचे काम अरुण मादेशवार हे सातत्याने करीत आहेत. हे परखड काम करीत असतांना असाच एक गुंजेवाही मधील वनजमीनी वरील अतिक्रमण प्रकरणाचा डिजिटल मिडियातून वृत्त प्रकाशित करुन पर्दाफाश केला. या वृत्ताची दखल घेऊन वनप्रशासनांनी चौकशी सुरु केली व अतिक्रमण हटविण्याच्या सुचना त्या वनजमीन अतिक्रमण धारकांना दिल्या. याचाच राग मनात घेऊन तेथील काही गावगुंडानी अरुण मादेशवार यांना मारण्याचे कटकारस्थान रचून अरुण मादेशवार हे गु़जेवाही वरुन सिंदेवाही ला आपल्या मुलासह जात आसतांना मध्येच त्यांना अडवून आमची बातमी का बरं दिली ? असे म्हणत अश्लिल शिविगाळ करुन त्यांना व त्याच्या मुलाला बेदम मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी आहेत. एवढे क्रुर कृत्य त्या गावगुंडाकडून घडले असल्याने त्या गावगुंडाच्या या गैर कृत्याचा पुरोगामी पत्रकार संघटनेच्या वतीने विरोध करुन त्या दोषी गावगुंडावर कडक कारवाई करुन कठोर शिक्षा करावी अशा मागणीचे निवेदन पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने बल्लारपुर पोलीस निरीक्षकाना निवेदन देण्यात य आले. या निवेदनाची दखल घेत पोलीस निरीक्षकाना कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

निवेदन देतांना पुरोगामी पत्रकार संघटनेचे पुर्व विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर यांच्या मार्गदर्शनात पुरोगामी पत्रकार संघटनेचे बल्लारपुर तालुका अध्यक्ष प्रशांत रणदिवे, कार्यकारी अध्यक्ष विक्की दुपारे,उपाध्यक्ष आरिफ खान, सचिव शंकर महाकाली, कोषाध्यक्ष गौतम कांबळे, प्रसिद्ध प्रमुख राकेश कांबळे,आदींची उपस्थीती होती.