महाज्योति संचालक मंडळा मध्ये बेरोजगार युवक ओबीसीचा समावेश करावी गडचिरोली जिल्ह्यामध्ये एवढा अन्याय होत असतानाही ओबीसी युवक रुचित वांढरे यांचा ओबीसी महामंडळात समावेश नसल्याने जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे

250

 

हर्ष साखरे दखल न्युज भारत प्रतिनिधी

गडचिरोली:
ओबीसी , एनटी , वीजेएनटी प्रवर्गाच्या उन्नतीसाठी महाज्योति स्वायत संस्थेची स्थापन करण्यात आलेली आहे या मध्ये रुचित वांढरे यांच्या सारख्या ओबीसी विध्यार्थी , युवकांचा समावेश करन्याची गरज होती,रुचित वांढरे गेल्या कित्येक वर्षा पासून राष्ट्रीय ओबीसी महासंघ येथे विदर्भ युवक आघाडी चे अध्यक्ष असून त्यांना ओबीसी युवकांचे , ओबीसी कास्तकारांचे , बेरोजगार युवकांच्या प्रश्नांची जाणीव आहे तसेच याच प्रश्नाकरिता रुचित वांढरे यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून आता पर्यंत तीनदा आत जाऊन आलेले आहेत.महोदय महाज्योति मंडळा मध्ये ३ अशासकीय सदस्यांची संस्था बनविण्यात आलेली आहे आणि या मध्ये विशेषतः कुठलाही बेरोजगार ओबीसी युवकाचा समावेश नाही आणि याच्या व्यतिरिक्त ४० ते ५० वर्षावरील वयोवृद्ध लोकांनी जे की ज्यांना सामाजिक परिस्थिती ची जाणीव नाही अश्या लोकांना या महाज्योति महामंडळ या मध्ये घेण्यात आलेले आहे.परंतु या मध्ये एक बेरोजगार ओबीसी युवक मनुन ज्या गडचिरोली जिल्ह्यात सर्वात जास्त ओबीसी समाजावर अन्याय झाला आहे आणि असेच ओबीसी समाजाचे नेतृत्व रुचित वांढरे यांचा समावेश करवून घ्यावा अशी मागणी असताना देखील समस्त प्रश्नांची जाणीव ठेवून त्यांना योग्य प्रकारे काम करता येईल अशी ग्वाही संपूर्ण ओबीसी कार्यकर्त्यांना ,युवकांना , बेरोजगारांना व कास्तकाराणा असताना देखील महाविकास आघाडीने बघल दिल्याने संपूर्ण जिल्ह्यातील ओबीसी कार्यकर्त्यांमध्ये असंसतोष माजले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. रुचित वांढरे यांना महाज्योती महामंडळात समावेश न झाल्यास महाविकास आघाडी, विजय वडेट्टीवार व काँग्रेस पक्षाला बहिष्कार करण्याचे संकेत ओबीसी संघटनेच्या युवक ,विद्यार्थी तसेच समाज संघटनेनी दिले आहे