निलज-केशोरी नाल्यावरुन पुरात वाहून गेलेल्या दोघापैंकी एक बेपत्ता देवरी तालुक्यातील चिचगड क्षेत्रातील घटना….

145

विश्वदिप नंदेश्वर/ प्रतिनिधी

 

देवरी:- गोंदिया जिल्ह्यात ८-ऑगस्ट पासुन पावसाला सुरूवात झाली. सतत येत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागातील नदी-नाल्यांना पुर आल्यामुळे अनेक गावांचे संपर्क तुटले. येजा-करण्यास अडथळा निर्माण झाला आहे.अशीच घटना गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्याच्या चिचगड क्षेत्रातील खामखूर्रा, केशोरी- निलज मार्गावर असलेल्या नाल्यावर रात्री ८ वाजताच्या दरम्यान घडली.
निलज नाल्याच्या पुलावरून पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्या पुलावरुन वाहनांचे जाने येने बंद होते. गावातील लोकांच्या सांगण्यानुसार रविवारला रात्रीच्या वेळेस अरविंद पंढरी शहारे (वय 35) व संजय पांडे (वय 45) दोघेही राहणार चिचगड पुलावरुन आपली दुचाकी मोटारसायकल नेण्याच्या प्रयत्नात वाहून गेल्याची घटना घडली.या दोघा मित्रांपैकी संजय पांडे याने झाडाला पकडून आपला जीव कसबसा वाचविला. मात्र अरविंद शहारे हा पुरात वाहून गेला असून अद्यापही त्याचा कुठेच शोध लागलेला नाही. ही माहीती चीचगड पोलीसस्टेशन , देवरी येथील तहसीलदार व आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरेटे यानां मिळताच घटना स्थळाकडे धाव घेतली. त्यातच परिसराची पाहणी करता वाहुन गेेलेल्या व्यक्तिची माहीती न मिळाल्यास मा. आमदार कोरेटे यांच्या आदेशाने गोंदिया येथुन सकाळी १० .०० वाजत आपत्ती निवारण व्यवस्थापनाच्या वतीने अरविंदचा शोध घेण्यासाठी शोध पथकाने पाण्यात ऊडी घेतली.
या पुलाची मागणी मागील काही वर्षांपासून होती मात्र प्रशासनाचा निष्काळजीपणामुळे लोकांना आपला जीव गमवावा लागत असल्याची परिसरातील लोकांची प्रतिक्रिया आहे. व्रुत्त लिहे पर्यंत अरविंद शहारे यांचा शोध मोहीम सुरुच होता.