कसर्ला गावातील अलपवयीन मुलीवर सामूहिक बलत्कार करून तिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी – राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती ( NAPF) संघटनेची मागणी

204

 

जय रामटेके /तालुका प्रतिनिधी (८९९९३६२५४३)

नागभिड – तालुक्यातील कसर्ला गावातील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणारी अतिशय मनाला चीड आणणारी घटना घडली आहे .या घटनेचा निषेध व्यक्त करावा तो कमीच आहे या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. स्त्री शक्तीचा मानसन्मान करणाऱ्या महाराष्ट्रात वारंवार अश्या घटना घडत आहेत.याचे कारण कायद्याची भीती समाजात राहिली नाही. त्यामुळे या शेतमजुरी करणाऱ्या अल्प वयीन मुलीला व तिच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे म्हणून या गुन्ह्याचा मुख्य आरोपी मंगेश दिवाकर मगरे व अजय मुरलीधर नन्नावरे या नरधामांवर अतिशय कडक गुन्ह्याची नोंद करावी यासाठी राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती या संघटनेच्या वतीने पोलीस स्टेशन नागभिळ येथे निवेदन देण्यात आले.