जागतिक आदिवासी दिनानिमित्या साजरा

0
92

 

प्रतिनिधी /लोचन कोल्हे
ता. कोरची

कोरची :- दिनांक 9 आँगष्ट 2020 रोज रविवारला 9.30 वाजता जागतिक आदिवासी दिनानिमित्या बिरसा मुंडा व राणी दुर्गावती चौक कोरची येथे सप्तरंगी ध्वजरोहणाचा कार्यक्रम शामलालजी मडावी गोंड समाज तालुका अध्यक्ष कोरची यांचे हस्ते पार पडला .तर आदिवासींचे पारंपारिक रित्य एकत्र जमण्याचे स्थान म्हणजे गोटुल. या गोटुलभुमी टि पाईंट पकनाभट्टी रोड कोरची येथिल भव्य पटांगणातील सप्तरंगीध्वज रोहण मा.रामसुरामजी काटेंगे गोंडसमाज उपाध्यक्ष तालुका कोरची यांचे हस्ते पार पडला .जागतिक आदिवासी दिनानिमित्या प्रमुख अतिथी म्हणुन भगतरामजी दर्रो अध्यक्ष आँल इंडिया आदिवासी एमफ्लाईंज फेडरेशन तालुका शाखा कोरची .मा.मगर सर,मा.बोगा सर,मा.सोनकलंगी सर ,मा.हिरालालजी राऊत साहेब नगरसेवक कोरची मा.लक्ष्मणजी कुमरे साहेब,मा.दुग्गा साहेब ,मा.ईजामसायजी काटेंगे सामाजिक कार्यकर्ता ,मा .झाडुरामजी हलामी सह तालुक्यातील आदिवासी सामाजातील कार्यकर्ते व समाजबांधव सहभागी झाले होते.बिरसामुंडा व राणी दुर्गावती चौक कोरची येथे सप्तरंगी ध्वजरोहण करतांना शामलालजी मडावीसह इतर पदाधिकारी व कर्मचारी .गोटुलभुमी टि पाईंट कोरची येथे सप्तरंगी ध्वजरोहण करतांना मा रामसुरामजी काटेंगें व इतरसाल्हे येथे येथे पारंपारिक दैवंतांची पुजन व सप्तरंगी ध्वजरोहण करतांना गावपुजारी मेहरू गोटा , रामदास कुमरे ,दलसाय गोटा,चमरु होळी समशिला कुमरे पोलीस पाटील,अंगणवाडी सेविका कुमरे ताई व उपस्थित गावकरी ।