Home महाराष्ट्र कोल्ड-ड्रिंक मध्ये गुंगीचे औषध देऊन नागपुरात विवाहितेवर हाँटेल मध्ये बलात्कार; आरोपी...

कोल्ड-ड्रिंक मध्ये गुंगीचे औषध देऊन नागपुरात विवाहितेवर हाँटेल मध्ये बलात्कार; आरोपी महादुला-कोराडी येथील अटकेत

2044

 

दखल न्युज भारत टीम नागपूर: 11 आँगस्ट 2020
थोडीशी ओळख व मैत्री असणाऱ्या व एकाच काँलेज मध्ये शिकलेल्या एका विवाहित महिलेला भेटायला एका युवकाने बोलावले. जर ती भेटायला आली नाही तर तिच्याशी शारीरिक संबंध असल्याची बदनामी तिच्या पतीला करेल अशी धमकी एका विवाहित महिलेला दिली. त्यानंतर त्या विवाहित महिलेला त्या युवकाने दि. 31 जुलै 2020 ला भेटायला बोलावले. ती पिडित विवाहिता सिताबर्डी नागपूर येथे या युवकास भेटायला आली. त्यानंतर हा युवक त्या विवाहित महिलेला घेऊन हाँटेल तारा डिलक्स मध्ये घेऊन गेला. तिथे तिला कोल्ड्रिंक मध्ये गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला असल्याची घटना घडली.
पिडित विवाहित महिलेवर बलात्कार करणारा युवक महादुला-कोराडी येथील शोएब शब्बीर शेख वय 30 वर्षे अाहे. 2 दिवसांनी ही पिडित विवाहित महिला खरेदी करण्यासाठी सिताबर्डी येथे आली असता, पुन्हा तिला हाँटेल तारा डिलक्स मध्ये नेऊन तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. पिडिताने आपली आपबीती आपल्या पतीला सांगितली. त्यानंतर पिडित विवाहित महिला व तिच्या पतीने आरोपी शोएब शब्बीर शेख याचेविरोधात नागपूर च्या सिताबर्डी पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केली.
त्यानंतर सिताबर्डी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांनी आरोपी शोएब शब्बीर शेख वय 30 वर्षे रा. महादुला कोराडी याचेविरोधात 328, 376, 504, 506 अंतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीला दि. 9 आँगस्ट 2020 रोजी अटक केली आहे अशी माहिती तपासी अधिकारी API किशोर शेरकी यांनी सांगितली. पुढील तपास तपासी अधिकारी API किशोर शेरकी करीत आहेत. आरोपीस 2 दिवसाच्या पोलीस कस्टडीत घेतले अशी माहिती API किशोर शेरकी यांनी दखल न्यूज भारत टीम ला दिली.

Previous articleगडचिरोली जिल्हयात दुचाकीचे सर्वांत जास्त अपघात; हेल्मेटचा वापर आवश्यकच : जिल्हाधिकारी दीपक सिंगला यावर्षी 7 महिन्यात 63 पैकी 37 मृत्यू दुचाकीधारकांचे
Next articleअमरावती जिल्ह्यातील लालखडी परिसरामध्ये खून..