बुरड कामगारांना हिरव्या बांबूचा पुरवठा करा. अध्यक्ष बुरड कामगार संघटना

112

 

सदाशिव माकडे (प्रतिनिधी)
(गडचिरोली जिल्हा)

गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील बुरड कामगारांना वनविभागाच्या वतीने हिरवे बाबुं पुरविले जातत् परतुं गेल्या चार महीण्यापासुन वनविभागाने विक्री डेपोवर बुरड कामगारांसाठी बांबूचा पुरवठा न केल्याने बुरड बांबू कामगारांचा रोजगार संकटात सापडुन अनेक कुटुंबे उघड्यावर आले आहेत करीता वनविभागाने तात्काळ हिरव्या बांबूचा पुरवठा करावा अशी मागणी आरमोरी तालुका बुरड कामगार संघटनेचे अध्यक्ष यांनी मुख्य वनसंरक्षक गडचिरोली यांच्याकडे केली आहे.

बुरड बांबू कामगाराचा सर्वांगिण विकास व्हावा म्हणून शासनाच्या वतीने काही बांबूच्या कीमतीत सुट देऊन हिरवे बांबू उपलब्ध करुन दिल्या जातो परंतु गेल्या चार महिन्यांपासून कोरोना संकट काळात बांबूचा पुरवठा झाला नसल्यामुळे बुरड कामगारांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. यातील सर्वच बुरड कामगार भुमिहीन असल्यामुळे त्यांचा बांबू पासुन साहीत्य बनविने हाच एकच रोजगार असतानाही शासन स्तरावरुन बांबू उपलब्ध झाला नसल्यामुळे कामगारांना पुढे आथिर्क सकट निर्माण झाले असल्याची बाब बुरड बाबु कामगार रामकृष्ण हिरापुरे सह कामगारानी आरमोरी तालुका बुरड कामगार संघटनेचे अध्यक्ष यांची भेट घेऊन समस्या सांगितले यावरुण अध्यक्ष यांनी याची दखल घेऊन मुख्य वनसंरक्षक गडचिरोली यांच्या कडे बुरड बांबु कामगाराना हिरव्या बांबु पुरवठा करा अशी मागणी केली आहे.