तिरोड्या तालुक्यातील कोविड १९ ने घेतला जेष्ठ नागरिकाचा दुसरा घास

 

अतित डोंगरे दखल न्यूज तिरोडा प्रतिनिधी

तिरोडा : तिरोडा तालुका सध्या कोविड बाबतीत अतिसंवेदनशील क्षेत्र बनत चालले आहे. यापूर्वी कोविडचा एकाच बळी घेतला होता. आता तिरोडा तालुक्यातील घोगरा पाटील टोला गावातील नागरिकांचा कोरोनाने दिनांक १० आगष्ट रोजी दुसरा घास घेतला आहे.
उल्लेखनीय असे की, ते जेष्ठ नागरिक या सदरात मोडत होते. त्यांचे वय ६२ वर्षाचे होते. दिनांक ८ आगष्ट रोजी त्यांना बरे वाटत नसल्याने ते उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे उपचारकरिता गेले होते. थोडेसे तापाची लक्षणे त्यांना होती. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून त्यांचे (रॅपिड) अँटीजन तपासणी करून सरांडी येथील कोविड काळजी वाहू केंद्र येथे रवानगी करण्यात आली होती. दिनांक ९ आगष्ट रोजी आरटीपीसीआर नमुना परिक्षणकरिता पाठविण्यात आले होते. त्यांचे आरटीपीसीआर तपासणी येण्यापूर्वी दिनांक १० आगष्ट रोजी सकाळी १०.३० वाजता दरम्यान कोविड काळजी वाहू केंद्रात प्रकृतीत चिंताजनक आढळताच त्यांना उपजिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले असता उपजिल्हा रुग्णालय तिरोडा यांनी तपासणी करून त्यांना मृत झाले असल्याचे घोषित केले. पण त्याचे तपासणी अहवाल आले नसल्याने उपजिल्हा रुग्णालय प्रशासन समोर मृतदेह त्यांचे नातलगांना द्यायचे कसे यामुळे नातलगांना सायंकाळी ७.०० वाजता पर्यंत नातलगांना तातकळत रहावे लागले.
अखेर कोविड १९ परीक्षण अहवाल सकारात्मक आल्याने आरोग्य विभाग, नगरपालिका प्राशन आणि मोचके नातलग यांचे उपस्थितीत तिरोडा येथील मोक्षधाम येथे अंतिम संस्कार करण्यात आले.
मृतक हे अतिशय मनमिळावू, मितभाषी, हस्कर बाण्याचे असल्याने त्यांचे आकस्मिक पण चालता बोलता निघून गेल्याने अख्या गावातच नव्हे तर परिसरातील जनतेने हळहळ व्यक्त केली असून त्यांचे परिवरा करिता दुःख मुक्तीची प्रार्थना करीत शोक संवेदना व्यक्त केली आहे.