दर्यापूर तालुक्यात कोरोनाने केले अर्धशतक पार, नागरिक मात्र बिनधास्त

130

दर्यापूर(उपजिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
सर्वत्र कोरोना या आजाराने कहर केला आहे सुरवातीला विदेशात असणारा हा संसर्गजन्य आजार आत्ता ग्रामिण भागातही पोहचला आहे याला आळा घालण्यासाठी प्रशासनाने तीन महिने लॉकडाउन केले होते
दरम्यान या काळात दर्यापूर तालुक्यात कोरोनाचा आजार नियंत्रित होता मात्र जसे लॉकडाऊन बंद झाले व दर्यापूर शहरातील बाजारपेठ सुरु झाली आणि तालुक्यात कोरोनाचे आगमन झाले पाहता पाहता हि संख्या झपाट्याने वाढत गेली रोज नविन रुग्णाची भर पडत आहे त्यामुळे दर्यापूर शहरासह ग्रामिण भागात याचा शिरकाव होऊन कोरोनाने तालुक्यात अर्धशतक पार केले आहे प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना वारंवार देण्यात येत असून नागरिक मात्र बिनधास्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे