माजी खा.मारोतराव कोवासे यांचा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते सत्कार.

98

प्रतिनिधी प्रविन तिवाडे
गडचिरोली –गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे प्रथम खासदार, माजी राज्यमंत्री तथा जिल्ह्यतील आदिवासीं नेते मारोतराव कोवासे साहेब यांचा जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील सुकळी येथे सत्कार करण्यात आला. यावेळी नाना पटोले यांनी माजी खा.मारोतराव कोवासे यांच्यासोबत आदिवासी विकासासंदर्भात मंथन करून काही सूचना दिल्या.याप्रसंगी देसाईगंज चे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवाणी, प्रदेश कांग्रेस कमिटीचे माजी सदस्य बंडू शनिवारे, महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस चे सचिव विश्वजित कोवासे, गडचिरोली जिल्हा युवक कांग्रेसचे महासचिव सौरभ म्हशाखेत्री,एन. एस. यु आय चे नितेश राठोड उपस्थित होते.