व्यापाऱ्यांनी मानले ॲड बाळासाहेब आंबेडकर यांचे प्रत्यक्ष भेटून आभार

97

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी ऑड ईव्हन पध्दत सुरू आहे तसेच सतत दोन दोन दिवस कडक लॉकडाउन सुरु आहे परंतु आम्ही लॉकडाउन पाळणार नाही आम्हाला जगु द्या या ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या आग्रही भुमीकेमुळे अकोला जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला व ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या भुमीकेमुळे अकोलाजिल्ह्यातील ऑड आणि ईव्हन हि पद्धत बंद होऊन सर्वांना आपला व्यवसाय करण्याची मोकळीक मिळाली वंचित बहुजन आघाडी ने व्यापाऱ्यांना दिलेल्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले त्यामुळे आज सर्व व्यापारी वर्गानी व्यापारी नेते मनोहर पंजवानी, बालमुकुंद भिरड, ॲड संतोष रहाट यांच्या नेतृत्वाखाली गिरधर चंदाणी, टेकचंद तोलाणी, हरिश रोहरा, महेश हेमनानी, मुकेश हेमनानी, दिपक लालवानी, अनिल चंदवानी, राजकुमार हेमनानी, मनिन राजपाल, जितेंद्र कोटवानी, जय सचदेव, सोनु भाटिया, आसानंद टकरानी, मनवानी सेठ यांनी ॲड बाळासाहेब आंबेडकर यांची प्रत्यक्ष भेट घेउन आभार मानले तसेच येणाऱ्या पुढील सर्व आंदोलनात सोबत असल्याची ग्वाही दिली. याप्रसंगी डॉ प्रसन्नजीत गवई, शंकरराव ईंगळे, पराग गवई, गजानन दांडगे उपस्थित होते.