वणी : विशाल ठोंबरे
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत इतिहासात पहिल्यांदाच तालुक्यात एका तरुणांने परिक्षा उत्तीर्ण केली. या परिक्षेत सुमितला ७४८ वी रँक मिळाली असुन तो आता आयएएस, आयएफएस किंवा आयपिएस कँडरमध्ये जावुन हा तरुण देशसेवा करणार आहे.या यशामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असुन सुमितचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी
न्युज मिडीया पत्रकार असोसिएशनचे सचिव परशुराम पोटे यांनी शिरपुर येथे सुमित रामटेके यांचे घरी जाऊन त्यांचा शाल श्रीफळ व मिठाई देऊन सत्कार केला.व पुढिल यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्या दिल्या.