डॉ. कुणाल खेमणार, जिल्हाधिकारी यांचे बदलीचे चर्चेला पुर्ण विराम. त्यांची जागा नवे जिल्हाधिकारी ए. ए. गुल्हाने घेणार.

(चंद्रपूर जिल्हा)
भगवंत पोपटे,
नागपूर विभागीय प्रतिनिधी,
दखल न्युज व दखल न्युज भारत.

चंद्रपूर चे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, यांचे बदलीचे चर्चेला आठवडाभरापासून उधाण आले असतांनाच आज दिनांक- १० अॉगस्ट २०२० ला सरकारतर्फे काढण्यात आलेल्या राजपत्रित अधिकारी यांचे बदलीचे यादित आय. ए. एस. रॅंकचे पाच अधिकाऱ्यांचे नावे समाविष्ट असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यात चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून नवि मुंबई येथील जलस्वराज्य प्रोजेक्ट चे प्रोजेक्ट मॅनेजर या पदावर कार्यरत असलेले श्री. ए. ए. गुल्हाने यांची चंद्रपूर चे नवे जिल्हाधिकारी म्हणून निवड झालेली आहे.
श्री. ए. ए. गुल्हाने हे भारतीय प्रशसकीय सेवेत सन २०१० ला रुजू झाले असून, श्री. गुल्हाने यांचे चंद्रपूर जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून निवड झाल्याने, सद्याचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, यांचे बदलीचे चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे हे नक्की.