दोन वर्षात गडचिरोली पोलिस दलाने नक्षल्यांच्या वरीष्ठ कॅडरच्या मुसक्या आवळून नक्षल चळवळीचे मोडले कंबरडे – २ डिकेएसझेडसी, ८ डिव्हीसी, ४ दलम कमांडर आणि ३ दलम उपकमांडर ला अटक करण्यात यश गडचिरोली जिल्ह्यात नक्षल चळवळीला जबरदस्त हादरा

144

 

जगदीश वेन्नम /हर्षे साखरे

गडचिरोली : जिल्ह्यातून नक्षलवाद मिटविण्यासाठी गडचिरोली पोलिस दल अनेक कारवाया करीत असून २०१९ – २० या वर्षात ऐतिहासिक व उत्तूंग कामगिरी करीत नक्षल्यांच्या वरीष्ठ कॅडरला लक्ष्य केले आहे. गेल्या २ वर्षात गडचिरोली पोलिस दलाने २ डिकेएसझेडसी मेंबर, ८ डिव्हीसी, ४ दलम कमांडर व ३ दलम उपकमांडर अशा मोठ्या कॅडरना अटक तसेच ठार केले. काहींनी आत्मसमर्पण केले आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.
गडचिरोली पोलिस दलाच्या कामगिरीमुळे जिल्ह्यातील वरीष्ठ नक्षली कॅडर नेस्तनाबुत करण्यात यश मिळाले आहे. गडचिरोली पोलिस दलाचे सातत्यपूर्ण यशस्वी नक्षलविरोधी अभियान, अतिदुर्गम भागातील सामान्य आदिवासी बांधवांसाठी गडचिरोली पोलिस दलातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजना, उपक्रम व गडचिरोली पोलिस दलाने सामान्य आदिवासी बांधवांचा संपादन केलेला विश्वास यामुळे गडचिरोली पोलिस दल सातत्यपूर्ण यशस्वी कामगिरी करीत आहे. त्याचबरोबर तरूण – तरूणींची नक्षल्यांमध्ये होणारी भरती शुण्यावर आणण्यात गडचिरोली पोलिस दलाने यश मिळविले आहे.
पोलिस अधीक्षक शैलेश बवकवडे यांनी नक्षल्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्याच्या विकासात आड येणाऱ्या नक्षल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात पोलिस दल सक्षम असल्याचे म्हटले आहे. आज टिपागड दलमचा जहाल नक्षली डिव्हिसीएम यशवंत बोगा याला पत्नीसह अटक करणाऱ्या संपूर्ण पोलिस चमुचे कौतुक करीत अभिनंदन केले आहे. तसेच रोख पुरस्कारही जाहीर केला आहे.
गडचिरोली पोलिस परीक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक महादेव तांबडे यांनी पोलिस दलाच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे कौतुक करीत अभिनंदन केले आहे.