४० हजार रुपये वीजबिल आल्याने नागपुरात एका सुरक्षा रक्षकांने केली आत्महत्या

205

 

सुनील उत्तमराव साळवे
(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

नागपुर : ११ आँगस्ट २०२०
नागपुर शहरातील यशोधरानगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पाहुणे ले आऊट येथे राहणाऱ्या लीलाधर लक्ष्मण गायधने वय (५६ वर्ष) यांनी ४० हजार रुपये वीजबिल आल्याने निराश होऊन आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे.
यशोधरानगर पो. स्टे. चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक साखरे यांनी माहिती देताना सांगितले की, दि. ८ आँगस्ट २०२० रोजी दुपारी १ वाजता लीलाधर गायधने यांनी दारुच्या नशेत आत्महत्या केली असे त्यांचा मुलगा अमित यांने कबुली जवाब दिला आहे. हे मात्र खरे आहे की त्याला ४० हजार रुपये वीजबिल आल्याने ते निराश आणि चिंताग्रस्त होते. मात्र नेमके त्याच कारणाने स्वतःला जाळुन घेऊन आत्महत्या केली कि अजुन इतर कोणत्या कारणाने याविषयी अधिक तपास सुरु आहे.
४० हजार रुपये वाढीव बिल आल्याने लीलाधर गायधने यांनी संबंधित महावितरण कंपनीच्या अधिकारी यांना भेटुन बिल कमी करण्यासाठी अनेकदा हेलपाटे घातले पण अधिकारी व कर्मचारी यांनी एक ना ऐकता त्यांचे वीज कनेक्शन कापण्याची धमकी दिली होती. त्यामुळे लीलाधर गायधने हे अधिकच टेन्शन मध्ये होते असे त्यांच्या नातेवाईकांनी आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांनी दखल न्यूज भारत शी बोलताना सांगितले.
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत तसेच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी गंभीरतेने घेऊन अतितात्काळ लाँक डाऊन मधील २०० युनिट पर्यंतचे वीज बील अतितात्काळ माफ करावे अन्यथा दिवसेंदिवस अशा आत्महत्या करण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकांवर येऊ शकते.