वणी : परशुराम पोटे
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत इतिहासात पहिल्यांदाच तालुक्यात एकाचवेळी दोन तरुणांनी परिक्षा उत्तीर्ण केली. वणीचा अभिनव इंगोले याने ६२४ वी तर सुमितला ७४८ वी रँक मिळाली असुन ते आता आयएएस,आयएफएस किंवा आयपिएस कँडरमध्ये जावुन हे तरुण देशसेवा करणार आहे.या यशामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असुन त्या तरुणांचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी वणी विधानसभेचे लोकप्रिय आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार व पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेन्डे यांचेसह भाजपाचे तालुकाध्यक्ष गजानन विधाते, यांनी शिरपुरचा सुमित रामटेके व वणीचा अभिनव इंगोले यांचे घरी जाऊन त्यांचा शाल श्रीफळ व मिठाई देऊन सत्कार केला.व पुढिल यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्या दिल्या.
यावेळी भाजपाचे रवि बेलुरकर ,वणी नगर पालीकेचे उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे,गजानन बांदुरकर तालुका सरचिटनिस,सुरेश पा.धानोकर उपस्थित होते.