कन्हानच्या एका वृध्द रूग्णाचा मुत्यु तर खदान ९, कांद्री २,करंभाड १ पिपरी १रूग्ण बाधित तालुका वैद्याकिय अधिकारी डाक्टर प्रशांत वाघ याची माहीती  कन्हान परिसर १७२, पारशिवनी ३० रूग्णासह तालुका व्दिशतक पार

 

कमलसिह यादव
पारशिवनी तालुका प्रातिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

पाराशिवनी(ता प्र) : – कोविड- १९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत असुन धरम नगर कन्हान येथील ६४ वर्षीय वृध्दाची प्रकृती बिघडल्याने कामठी खाजगी रूग्णालयात दोन दिवसा पहिले भर्ती केले त्याची कोविड-१९ तपासणी केली. त्या चा अहवाल पॉझीटिव्ह आला आणि रविवार (दि.९) ला उपचारा दरम्यान कामठी ला कन्हानच्या वृध्दाचा मुत्यु झाला.
दि.०९ आगस्ट २०२० पर्यंत कन्हान परिसर १५९ रूग्णासह पारशिवनी २९ असे तालुक्यात १८८ रूग्ण होते. तर आज सोमवार (दि.१०) ला मुकबंधिर शाळा कांद्री ला ४३ लोकांची रॅपेट तपासणी करण्यात आली. यात टेकाडी कोळसा खदान नं ६ चे ९ व कांद्री २ असे ११ कोरोना बाधित रूग्ण आढळले.धरमनगर कन्हान येथील एका वृध्दाचा मुत्यु झाला. कन्हान परिसर १७२ पारशिवनी येथे ४२ लोकांची रॅपेट तपासणी केली. यात करंभाड चा १ पॉझीटिव्ह आढळला. पारशिवनी १ असे तालुक्यात १२ रूग्ण आढळुन तालुक्या ची एकुण २०२रूग्ण संख्या झाली आहे. यात सोमवार (दि१०) ला कन्हान ९४ पिपरी २६, कांद्री २६, टेकाडी कोळ्साखदान१६, बोरडा १, मेंहदी ८ असे कन्हान परिसर १७२ व पारशिवनी ३० असे एकुण तालुक्यात २०२ रूग्ण होत व्दि शतक पार केले आहे. यातील आता पर्यंत कन्हान शहरात ४, कांद्री २ रूग्णाचा मुत्यु होऊन कन्हान परिसरात एकुण ६ रूग्णाचा मुत्यु झाला आहे.