श्रीराम सिटी युनियन फायनान्स चिपळूण कंपनी विरोधात युवासेना का झाली आक्रमक?

167

 

प्रतिनिधी / प्रसाद गांधी.

चिपळूण :- श्रीराम सिटी युनियन फायनान्स चिपळूण कंपनीमध्ये येथील स्थानिक मुले काम करत आहेत मात्र त्यांना कंपनीतून स्थलांतरित करणे, कामावरून काढणे अशा प्रकारानी त्यांना नाहक त्रास सदर कंपनी देत आहे. या स्थानिकांच्या रोजगार बाबत जाब विचारत युवासेना कङुन या कंपनीला आज टाळे लावण्यात आले. सदर मुलांच्या अडचणी सोडवत नाही तोपर्यंत कंपनी बंद ठेवण्याचा इशारा युवासेना जिल्हाधिकारी श्री अजिंक्य मोरे यांनी सदर कंपनीला दिला.
सदर वेळी युवासेना चिपळूण शहर अधिकारी श्री निहार कोवळे, उपतालुका अधिकारी श्री सौरभ चाळके, उपशहर अधिकारी श्री अभिजीत चीखले, विभाग अधिकारी श्री प्रणय ननावरे , युवासैनिक उपस्थित होते .

*दखल न्यूज भारत*