मनसेच्या दणक्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला आली जाग. अवघ्या काही तासांतच लागले कामाला

135

 

प्रतिनिधी / प्रसाद गांधी.

दापोली : वाकवली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या मोरीची साधारण पंधरा दिवस अगोदर साफसफाई करण्यात आली होती सदर कामात हलगर्जीपणा झाला होता त्यामुळे त्यातून पाण्याचा निचरा होत नाही तसेच सदर मोरी ४ते५ फुट खोल असल्याने अपघात तसेच कुणाचा तोल जाऊन दुखापत होण्याची दाट शक्यता आहे ही बाब मनसेच्या मयुर काते यांच्या लक्षात येताच सदर बाब सार्वजनिक बांधकाम विभाग दापोली उप अभियंता यांची भेट घेतली. चर्चा करून सार्वजनिक बांधकाम विभागाची कानउघाडणी केली. आणि अवघ्या काही तासांतच सार्वजनिक विभागाचे कर्मचारी वाकवली येथे हजर होऊन अगोदर झालेला हलगर्जीपणा सुधारण्यात आला. या प्रसंगी निवेदन देताना मनसेचे तालुकाध्यक्ष श्री नितीनजी साठे,मयुर काते, मिलिंद गोरिवले, समिर कुरेशी ,अल्पेश भुवड , अमोल काते उपस्थित होते.

*दखल न्यूज भारत*