कन्हान-पिपरी नगरपरिषदेत स्थायी मुख्यधिकारी द्या- शहर विकास मंच व्दारे उपविभागीय कन्हान-पिपरी नगरपरिषदेत स्थायी मुख्यधिकारी द्या- शहर विकास मंच व्दारे उपविभा गीय अधिकारी व आमदारास निवेदन

119

 

कमलसिह यादव
पाराशिवनी तालुका प्रतिनिधी
दखल न्युज भारत, नागपुर

कन्हान(ता प्र) : – शहरात कोरोना आजाराचा प्रार्दुभाव दिवसेदिवस वाढत असुन येथे स्थायी मुख्याधिकारी नसल्याने न प कन्हान प्रशासनाला कोरोना नियंत्रक उपाय योजना व्यवस्थित राबविण्या करिता स्थायी मुख्याधिकारी देण्याची मागणी कन्हान शहर विकास मंच व्दारे उपविभागीय अधिकारी व आमदार यांना निवेदन देऊन केली.
महादुला नगर पंचायतचे स्थायी मुख्याधिकारी संदीप चिद्रेवार यांनी नगर परिषद कन्हान-पिपरीचा प्रभारी पदभार साभाळला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्या करिता महादुला सह कन्हान शहरात सु ध्दा उपाय योजना राबवित असताना शह रातील काही नागरिकांच्या असहकार्याने दुखावुन व नवनियुक्त मुख्याधिकारी गिरीष बन्नोरे यांनी ३० जुलै ला पदभार स्विकारला नसताना संदीप चिद्रेवार यां नी पदभार सोडला. आठदिवस होऊन नवनियुक्त मुख्याधिकारी रूजु न झाल्या ने कोरोना रूग्णाची दिवसेदिवस संख्या वाढत आता पर्यंत तीन रूग्णाचा मुत्यु झाला आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्या च्या नियंत्रक उपाय योजना प्रभावी का र्यान्वित करण्याकरिता प्रशासन प्रमुख म्हणुन कन्हान ला स्थायी मुख्याधिकारी त्वरित देण्यात यावा. अशी मागणी मा. जोंगेंद्र कटियारे उपविभागीय अधिकारी रामटेक व क्षेत्राचे आमदार जैस्वाल हया ना कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रविण गोडे, उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचिव प्रदीप बावने, शाहरुख खान, सोनु मसराम, संजय रंगारी आदी सह मंच पदाधिकारी कार्यकर्त्यानी केली आहे.

.