ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने वाहतूक खोळंबली जीवितहानी झालेली नाही

154

 

साकोली तालुका प्रतिनिधी–ऋगवेद येवले

साकोली-शहरात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेले संततधार पाऊस असल्याने मोहघाटा फाट्याजवळ ट्रेलर पासून संपूर्ण साकोली शहरातील वाहतूक सेवा खोळंबली होती.
पहाटे 4 वाजताच्या सुमारास नागपूर कडे जात असलेल्या ट्रक (क्र.आर.जे.19 जी.जी.2492) चालकाचा ताबा सुटल्याने तो झाडावर येवून आदडला या अपघातात जीवितहानी झालेली नाही.परंतु या अपघातानंतर कलकत्ता मुंबई महामार्ग क्रमांक 6 वरील वाहतूक दिवसभर ठप्प झाली होती.हे ट्रक मालवाहतूक असल्याने यामध्ये जवळपास पन्नास टन (टाईल्स) माल असल्याचे सांगितले जात आहे.
साकोली प्रशासनाला दिवसभरा पासून सुरू असलेल्या प्रयत्नाला अखेर सां.साडे सहाच्या सुमारास यश आले.व वाहतूक सेवा सुरळीत सुरू झाली.