शिवसेना व युवासेना तर्फे कुपोषित बालकांना सकस आहार किटचे वाटप

136

 

प्रतिनिधी:रोहन आदेवार

मारेगाव: मा.ना.श्री.उद्धव  ठाकरे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख यांच्या वाढदिवस निम्मित 80% समाजकार्य या शिवसेना पक्षाच्या ब्रीद वाक्याप्रमाणे मा.ना. श्री. संजय  राठोड पालकमंत्री यवतमाळ तथा वनमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कुपोषित बालकांना सकस आहार किट चे वाटप करण्यात आले. पंचायत समिती मारेगाव च्या सभागृहात मा.श्री. विश्वासभाऊ नांदेकर जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सौ. रेखाताई मडावी नगराध्यक्षा मारेगाव मा.पांडे साहेब गटविकास अधिकारी पं. स.मारेगाव , मा.सौ डिमनताई टोंगे शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा संघटक, मा.संजयभाऊ आवारी शिवसेना तालुका प्रमुख तथा उपसभापती पं.स.मारेगाव, ICDS मारेगाव च्या सौ.कनाके मॅडम प्रमुख उपस्थित होते. मारेगाव तालुक्यातील SAM आणि MAM अश्या कुपोषित बालकांना सकस आहार किट चे वाटप करण्यात आले.
त्यावेळी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, विद्यार्थी सेना चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.