अकोट युवासेना शिवसेनेच्या वतीने कर्नाटक मधील भाजप सरकारचा रस्ता रोको करून जाहीर निषेध

0
93

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

आज दि. 10 आॅगस्ट रोजी अकोट युवासेना शिवसेनेच्या वतीने कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.कर्नाटक मधील बेळगांव जिल्हयात मानगुत्ती या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक रातोरात हटविण्याच्या निषेधार्थ कर्नाटक चे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या आणि तेथील भाजप सरकारच्या कटकारस्थानच्या विरोधात अकोट युवासेना शिवसेनेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करीत आकोली जहाँ फाटा येथे सोशल डिस्टनसिंग चे पालन करीत रस्ता रोको आंदोलन करत. युवासेना विस्तारक राहुल रामाभाऊ कराळे यांच्या नेतृत्वात जाहीर निषेध करण्यात आला.या वेळी शिवसेना तालुका प्रमुख श्याम गावंडे, अमोल बदरखे, राजेंद्र अंबिरलाल मोरे, श्रीजित कराळे, कुणाल कुलट, गजानन कोलखेडे, किरण शेंडे, दिणेश बोचे, देवा मोरे, सागर कराळे, शुभम जवनजाळ, अंकुश बोचे ,गौरव हिंगणकर ,अंकुश पांडे , राजू येरोकर तसेच शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी तसेच शिवसैनिक उपस्थित होते.