Home महाराष्ट्र धक्कादायक घटना, करंजी हाँयवे वर कन्टेनर- दुचाकीच्या भिषन अपघातात वणीचा कोरोना योद्धा...

धक्कादायक घटना, करंजी हाँयवे वर कन्टेनर- दुचाकीच्या भिषन अपघातात वणीचा कोरोना योद्धा जागीच ठार

429

 

यवतमाळ/ परशुराम पोटे

कन्टेनर – दुचाकीच्या भिषन अपघातात वणी येथिल करोना योद्धा जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
बाळक्रुष्ण लक्षमण पिदुरकर(49)रा.लालगुडावणी असे अपघातात ठार झालेल्या ईसमाचे नाव आहे.बाळक्रुष्ण पिदुरकर हे वणी तालुक्यातील राजुर(काँलरी) येथिल राष्टीय महाविद्यालयात नोकरीवर असुन सद्या ते कोरोना योद्धा म्हणुन पळसोनी येथे कोविड-19 सेन्टर मध्ये काम करत होते.यादरम्यान शाळेच्या कामानिमीत्य ते त्यांची मो.सा.क्र.एमएच-29 एएक्स 4026 नि यवतमाळ येथे गेले होते.दि.6 आँगष्ट्ला यवतमाळ वरुन वणीकडे येत असतांना करंजी हाँयवे वरील मंगी फाट्या जवळ मागुन येणार्या भरधाव कंन्टेनर क्र.एनएल 01क्यु 2010 ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.या अपघातात बाळक्रुष्ण पिदुरकर हे जागीच ठार झाले.या घटनेची माहिती बाळक्रुष्ण यांचा मुलगा मयुर बाळक्रुष्ण पिदुरकर याला सायंकाळी 6 वाजताचे दरम्यान मिळताच आजोबा सह मयुर ने घटनास्थळी धाव घेतली परंतु तोपर्यंत पांढरकवडा पोलीसांनी घटना स्थळ पंचनामा करुन म्रुत्युदेह शवविच्छेदन करण्यासाठी पांढरकवडा येथिल ग्रामिण रुग्णालयात पाठवण्यात आले होते. वडीलाचा अपघात झाल्यामुळे मयुरची मनस्थिती बिगडली होती परिणामी मयुर ने तेव्हा तक्रार दाखल केली नव्हती परंतु दुसर्यादिवशी दि.7 आँगष्टला प्रक्रुती ठिक झाल्यावर पांढरकवडा पोलीस ठाणे गाठुन कंटेनर क्र.एनएल 01 क्यु 2010 चा चालक राजीवीर भोलु रामजाट रा.चिरुली ता.हटुंडी जि.अलवर राजस्थान याने ताब्यातील कंटेनर भरधाव व निष्काळजीपने चालवुन वडीलाचे मरणास कारणीभुत ठरला अशी तक्रार दिली.या तक्रारीवरुन पांढरकवडा पोलीसांनी कलम 279,304अ भादंवी नुसार गुन्हा दाखल केला आहे.पुढिल तपास पोउनि/ अनिल चौधरी पो.स्टे.पांढरकवडा हे करित आहे.

Previous articleयुवक कॉंग्रेसने शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन केला २० लाख कोटीचा पर्दाफाश
Next articleअकोट युवासेना शिवसेनेच्या वतीने कर्नाटक मधील भाजप सरकारचा रस्ता रोको करून जाहीर निषेध