युवक कॉंग्रेसने शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन केला २० लाख कोटीचा पर्दाफाश

116

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस ने कहा गये २० लाख करोड ह्या अांदोलनांतर्गत २० लाख कोटींच्या पॅकेजचा पर्दाफाश करणारे आंदोलन १० ते १४ ऑगष्ट दरम्यान राज्यभरात पुकारले आहे. ह्या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणजे शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन शेतकर्‍यांच्या भेटी घेवुन २० लाख करोडच्या पॅकेजचा पर्दाफाश केला आहे.

महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके, अकोला जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष महेश गणगणे,शहर अध्यक्ष अंशुमन देशमुख, कॉंग्रेसचे कपिल रावदेव , आकाश सिरसाट ह्यांच्यासह पदाधीकार्‍यांनी आज गोरेगांव येथे शेतकरी तेजराव भाकरेव ह्यांच्या बांधावर जाऊन त्यांना २० लाख कोटींच्या पॅकेजचा काय फायदा झाला व त्या संबंधीचे अनेक प्रश्न विचारले.

ह्यावेळी २० लाख करोड च्या पॅकेजमधील कुठलेही पैसे शेतकर्‍यांपर्यंत पोहचले नसल्याचे लक्षात आले.

२० लाख करोडच्या पॅकेज अंतर्गत नरेंद्र मोदी शेतकर्‍यांना ४ लाख कोटी रुपयांचे कमी व्याजदरावर कर्ज देणार होते परंतु प्रत्यक्षात मात्र कर्जच मिळाले नसल्याचे ह्या शेतकरी भेटीतुन समोर आले.

किसान क्रेडीट कार्ड, डेअरी उत्पादक शेतकर्‍यांना कोट्यवधी रुपयांचे पॅकेज देणार होते परंतु प्रत्यक्षात मात्र शेतकर्‍यांच्या पदरात काहीच पडले नाही हे ह्या पर्दाफाश आंदोलनादरम्यान युवक कॉंग्रेसच्या लक्षात आले.
ह्यावेळी जोरात नारेबाजी करुन कहा गये ओ २० लाख करोड असा प्रश्ना थेट पंतप्रधानांना युवक कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी विचारला. ह्या वेळी शेतकरी संजय भाकरे, युवक कॉंग्रेसचे अक्षय इनामदार, राहुल थोटांगे, सुरज यादव, मयुर देशमुख, राम पिपरे आदी उपस्थीत होते.