आल्लापल्ली येथे विश्व आदिवासी गौरव दिवस कार्यक्रम थाटात संपन्न

119

 

प्रतिनिधी/रमेश बामनकर

दखल न्युज नेटवर्क
गुड्डीगुडम:अहेरी तालुक्यातीलआल्लापल्ली येथे आदिवासी गौरव दिवस कार्यक्रम थाटात संपन्न
जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार व प.स.सभापती श्री.भास्कर तलांडे यांची प्रमुख उपस्थिती
आलापली येते वीर बाबूराव गोटुल समिती कडून विश्व आदिवासी गौरव दिवस उत्सवात साजरी करण्यात आले.
सप्तरंगी ध्वजाचे ध्वजारोहण गोटुल समितीचे अध्यक्ष श्री.भीमराव आत्राम यांचे हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे विशेष अतिथि म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडावार,पंचायत समितिचे सभापती श्री.भास्कर तलांडे,होते.
यावेळी गोटुल समितीचे श्री.शंकर गावडे,किशोर सड़मेक,कपिल अर्का,प्रेमिला मडावी,चिंनका सड़मेक,आदि समाज बांधव उपस्थित होते.