Home कोरोना  जिल्ह्यात आणखी कोरोनाचे ४३ पॉझिटिव्ह रुग्ण आठ रुग्णांची कोरोनावर मात आतापर्यंत...

जिल्ह्यात आणखी कोरोनाचे ४३ पॉझिटिव्ह रुग्ण आठ रुग्णांची कोरोनावर मात आतापर्यंत ३३२ रुग्ण कोरोनामुक्त क्रियाशील रुग्ण संख्या २७७

142

 

सचिन श्यामकुंवर तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत. ..
गोंदिया दि.१०जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढतांना दिसत आहे. आज १० ऑगस्ट रोजी रोजी जिल्ह्यात ४३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचा अहवाल गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणू चाचणी प्रयोगशाळेतून प्राप्त झाला आहे.तर ८ रुग्ण कोरोनातुन बरे झाल्याने आज त्यांना सुट्टी देण्यात आली.

कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या ४३ रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण बाधित रूग्णांची संख्या ६४३ झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्यामुळे क्रियाशील रुग्ण संख्या वाढत आहे. क्रियाशील रुग्ण संख्या आता २७७ झाली आहे.यातील दोन रुग्ण उपचारासाठी बाहेर राज्यात आहे.

जिल्ह्यात आज जे ४३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आहे, त्यामध्ये गोंदिया शहरात ११ रुग्ण आढळले असून यामध्ये शास्त्री वार्ड, रेल्वे कॉलनी, सिव्हिल लाईन, वसंतनगर येथील प्रत्येकी एक रुग्ण आणि सात रुग्ण हे भीमनगर येथील आहेत.सडक/अर्जुनी तालुक्यात आठ रुग्ण आढळून आले असून पांढरवाणी, केसलवाडा व मंडिटोला येथे प्रत्येकी एक रुग्ण आणि सौंदड येथे पाच रुग्ण,तिरोडा तालुक्यात पाच रुग्ण आढळले असून यामध्ये सरांडी, बिरसी येथे प्रत्येकी दोन व एक रुग्ण हा खोडगाव येथील आहे. आमगाव तालुक्यातील शिवणटोला व कुणबीटोला येथे प्रत्येकी एक रुग्ण, पदमपुर येथे दोन रुग्ण आणि आमगाव येथे चार रुग्ण,सालेकसा तालुक्यात ११ रुग्ण आढळले असून यामध्ये गोरे येथे तीन, चेहारीटोला, तिरखेडी,मुरूमटोला येथे प्रत्येकी एक रुग्ण, धानोली येथे दोन व तीन रुग्ण सालेकसा येथे आढळून आले आहे.

कोरोनातून जे ८ रुग्ण बरे झाले त्यांना आज सुट्टी देण्यात आली.यामध्ये गोंदिया तालुक्यातील चार रुग्ण असून मुंडीपार,सेजगाव व गोंदिया शहरातील रेलटोली येथील प्रत्येकी एक रुग्ण आणि गोंदियाच्या सिंधी कॉलनीतील एक रुग्ण आहे.सडक/अर्जुनी तालुक्यातील हलबीटोला येथील एक रुग्ण, देवरी तालुक्यातील भागी आणि परसटोला येथील प्रत्येकी एक रुग्ण आणि एक रुग्ण हा अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील आहे.आतापर्यंत ३३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणू प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण ११२४८ नमुने पाठविण्यात आले. यामध्ये १०४०० नमुने निगेटिव्ह आढळून आले .५३१ नमुने पॉझिटिव्ह आढळले आहे.१४९ नमुन्यांच्या अहवाल प्रलंबित आहे.तर १६८ नमुन्यांचा अहवाल अनिश्चित आहे.

जिल्ह्याचे पाच बाधित रुग्ण हे जिल्ह्याबाहेर बाधित आढळले आहे.गोंदियाच्या प्रयोगशाळेतून ५३१ आणि रॅपिड अँटिजेन टेस्टमधून १०७ असे एकूण ६४३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.

जिल्ह्यात विविध संस्थात्मक विलगिकरण कक्षात २४९ व्यक्ती आणि गृह विलगिकरणात ८६२ व्यक्ती अशा एकूण ११११ व्यक्ती विलगिकरणात असून या सर्व प्रशासनाच्या देखरेखीखाली आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी त्यांची तपासणी करून उपचार करीत आहे.

कोरोना बाधित रुग्णांचा तात्काळ शोध रॅपिड अँटीजेन टेस्टच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. जिल्ह्यात ४७८९ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले.यामध्ये ४६८२ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहे.१०७ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी १९६ चमू आणि १०१ सुपरवायझर ९१ कॅटेंटमेंट क्षेत्रासाठी नियुक्त केले आहे.ज्या गावात आणि आणि नगर पालिका क्षेत्रात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे तो भाग कंटेंटमेंट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे.

क्रियाशील कॅटेंटमेंट क्षेत्र जिल्ह्यात ९१ आहे.यामध्ये गोंदिया तालुक्यात चांदणीटोला,कुडवा,गोंदिया येथील यादव चौक,रेलटोली, रेल्वे लाईन,श्रीनगर, शास्त्री वार्ड,संगम बिल्डींग गल्ली,श्रीनगर, क्षत्रिय मार्ग श्रीनगर व सिंधी कॉलोनी. सालेकसा तालुक्यातील भजेपार,सीतेपार, झालिया, धानोली, तिरखेडी, केहारीटोला व गोरे,देवरी तालुकयातील भागी,गरवारटोली व नवाटोला, देवरी शहरातील वार्ड क्रमांक ५,७,९,१०,१६ आणि १७. सडक/अर्जुनी तालुक्यातील कोलारगाव, हलबीटोला,डव्वा, मुंडीपार, सडक/अर्जुनी येथील वार्ड क्र.१४, सौंदड येथील गांधी वार्ड, कोहळीटोला,रेंगेपार व खाडीपार.आमगाव तालुक्यातील तेढा व पिंडकेपार.

तिरोडा तालुक्यातील बिरसी १ व २, वडेगाव,मुंडीकोटा,सतोना,लाखेगाव,माली,लोणार,खैरबोडी,गुमाधावडा, वडेगाव-२,गोंडमोहाडी,पाटीलटोला, गराडा,इसापूर,सेजगाव,पालडोंगरी, पिपरिया,खुर्शीपार,उमरी,पांजरा, सरांडी बाजार चौक, घोघरा, सरांडी, घोघरा-२, मुंडीकोटा बाजार चौक, वडेगाव २ ,मुंडीकोटा रेल्वे स्टेशन, खोलगाव, सालेबर्डी,खैरलांजी, कवलेवाडा,बयाबाब(मुंडीकोटा), तिरोडा शहरातील न्यू सुभाष वार्ड, नेहरू वार्ड,गुरुदेव वार्ड,महात्मा गांधी वार्ड,,रवींद्र वार्ड,लक्ष्मी वार्ड ,शाहिद मिश्रा वार्ड, महात्मा फुले वार्ड व लक्ष्मीनगर बेलाटी/खुर्दचा समावेश आहे.

अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील भिवखिडकी, सिंगलटोली, ताडगाव व वडेगाव आणि आमगाव तालुक्यातील चिरचाळबांध, तिगाव,बनगाव, डोंगरगाव पदमपुर, रिसामा व भवभूती वार्ड आदी गावे आणि वार्ड कंटेनमेंट क्षेत्रामध्ये आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भूषणकुमार रामटेके यांनी दिली.

काळजी घ्या
अंतर ठेवा
मास्क बांधा
सुरक्षित राहा

Previous articleआमगांव तालुक्यात 7 दिवसाचा जनता कफ्यु.. तहसीलदार व पुलिस निरिक्षक यांच्या उपस्थित बेठक..
Next articleआजोबाने नातवाला तंबाखू न दिल्यामुळे नातवाने केला आजोबाचा खून ; आरोपीस जन्मठेपेची शिक्षा आणि 5 हजार रुपये दंड जिल्हा व सत्र न्यायाधिश बी.एम. पाटील यांचा निकाल