आमगांव तालुक्यात 7 दिवसाचा जनता कफ्यु.. तहसीलदार व पुलिस निरिक्षक यांच्या उपस्थित बेठक..

सचिन श्यामकुंवर तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत..
आमगांव..दिवसेंदिवस आमगाव येथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून या साखळी तोडण्याच्या उपाययोजनेकरिता तालुका प्रशासनाने व पोलीस प्रशासन,सर्व व्यापारी संघटना आणि त्यांचे पदाधिकारी,सर्व डॉक्टर यांची बैठक आज नगरपरिषद कार्यालय येथे घेऊन बुधवारपासून(१२/०८/२०) पुढील सात दिवस (१८/०८/२० पर्यंत) जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.या जनता कर्फ्यू मध्ये वैद्यकीय सेवा,पेट्रोल पंप सुरू राहतील. दूध सकाळी नऊ पर्यंत मिळणार आहे.बाकी सर्व सेवा सात दिवस संपूर्ण बंद राहतील…