गडचांदूर येथे भंते ज्ञानज्योती यांची ऐतिहासिक बुद्धभूमी स्थळाला भेट. – बौद्ध बांधवांनी जनगणनेत बौद्ध म्हणून प्रखरतेने जात नोंद करण्यावर चर्चा. – ३१ ऑक्टो. रोजी चिमूर येथे अल्पसंख्याक सर्व धर्म परिषदेचे आयोजन. – बाबासाहेबांच्या संघटनेचे प्रचारक अशोककुमार उमरे आणि ‘विदर्भाचा वीर’ चे संस्थापक संपादक प्रभाकर खाडे यांची उपस्थिती.

46

 

संपादक//प्रीतम जनबंधु

गडचांदूर : – चांद्रपुर जिल्हा रामदेगी, चिमूर येथील भंते ज्ञानज्योती हे गडचांदूर ता. कोरपना जि. चंद्रपूर येथे दि. २२ ऑक्टोबर रोजी गडचांदूर येथील वर्षावास कार्यक्रमाला आले असता गडचांदूर येथील ऐतिहासिक बुद्धभूमी स्थळाला आपल्या संघासह सदिच्छा भेट दिली.

यावेळी बाबासाहेबांच्या संघटनेचे प्रचारक अशोककुमार उमरे आणि ‘विदर्भाचा वीर’ चे संस्थापक संपादक प्रभाकर खाडे यांनी भंते ज्ञानज्योती यांची भेट घेऊन येणाऱ्या जनगणनेत बौद्ध म्हणून नोंद करण्यासंदर्भात चर्चा केली. येणाऱ्या जनगणनेत काही कार्यकर्ते बौद्ध धम्मात जाती नसल्याने केवळ बौद्ध म्हणून आणि काही काही कार्यकर्ते बौद्ध धर्म व संबंधित जाती नोंद करावी, या मताचे असल्याने संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत काय नोंद करावी, अशी चर्चा भंतेजी सोबत केली असता या संदर्भात भंते ज्ञानज्योती यांनी म्हणाले की, काही कार्यकर्ते हेतू पुरस्पर संभ्रमाची परिस्थिती निर्माण करून बौद्धाची लोकसंख्या कमी करीत आहेत. बाबासाहेबांनी आपणाला जाती सोडावयास सांगितलेल्या जाती काही लोक लिहायला, कवटाळायला सांगत आहेत, ही बाबासाहेबांच्या विचारांची फसवणूक आहे. असे सांगणारे, प्रचार करणारे बाबासाहेबांचे विरोधक आहेत. बाबासाहेबांनी आपणाला जाती विरहित बौद्ध धम्म दिलेला आहे. आपण कोणाचेही न ऐकता केवळ बाबासाहेबांचे ऐकायचे आहे आणि बाबासाहेबांच्या आदेशांचे पालन करावे. ज्यांना बाबासाहेबांचे ऐकायचे आहे अशा बौद्ध बांधवांनी येणाऱ्या जनगणनेत धर्म आणि जातीच्या रकान्यात प्रखरतेने बौद्ध म्हणूनच नोंद करण्यात यावे. असे भंते ज्ञानज्योती यांनी आग्रहाने प्रतिपादन केले.

सदर चर्चे दरम्यान सामाजिक व धार्मिक स्थितीबाबत सुद्धा भंतेजी सोबत दिलखुलासपणे चर्चा झाली. त्याचप्रमाणे ३१ ऑक्टोबर २०२१ ला तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर येथे भंते ज्ञानज्योतीजी यांच्या अध्यक्षतेखाली अल्पसंख्याक सर्व धर्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहेत, त्यात आवर्जून उपस्थितीत राहण्यास सांगितले.

यावेळेस बाबासाहेबांच्या संघटनेचे प्रचारक अशोककुमार उमरे, विदर्भाचा वीर चे संस्थापक संपादक प्रभाकर खाडे, भन्ते कस्यप, चांदेकर आणि भसारकर उपस्थित होते.