दखल न्यूज भारतचे संपादक प्रीतम जनबंधू सर यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने… एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व, शांतप्रिय मनोधैर्याचे धनी

87

 

अश्विन बोदेले
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत

दखल न्यूज भारतचे संपादक आ. प्रीतम जनबंधू सर यांचा जन्म 24 ऑक्टोंबर रोजी छोट्या कुटुंबात दुर्गम भागात वसलेल्या डोंगर रांगेत बसलेल्या नरचुली या गावात झाला. तसे हे गाव डोंगराच्या कुशीत वसलेले आहे. परंतु डोंगराच्या कुशीतही काही अनमोल व्यक्तिमत्व सापडतात. हे आ. प्रीतम जनबंधू सर यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने दाखवून दिले आहे.
आदरणीय जनबंधू सर हे छोट्याशा खेड्यातून नावारूपाला आलेले एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेले शांतप्रिय मनोधैर्याचे उदाहरण आहेत.
अत्यंत साधेपणाने सुसंवाद साधनारे, मनमिळाऊ, स्वभावाचे व्यक्ती आहेत. नेहमी सर्वांसोबत सलोख्याने, प्रेमाने, आदराने, सामंजस्याने वागणारे व्यक्तिमत्व आहेत. सर्वांसोबत प्रेमाने वागून सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची शैली मनाला खूप भावलेली आहे. सर्वांना सहकार्य करून कधी सामाजिक कार्यात, कधी धार्मिक कार्यात सर्वांना केवळ मदतच करीत नाहीत तर कोणताही कार्य असो तो पुर्णत्वास नेण्यात नेहमी अग्रेसर असतात. असे त्यांच्या कार्यातुन एकदंरीत दिसुन आले आहे.

आदरणीय जनबंधू सरांना अगदी लहानपणापासूनच लिखाणाची खूप आवड आहे. त्यांनी यापूर्वी अनेक कविता व लेख वर्तमान पत्रात प्रकाशित केले आहेत. एकंदरीत विचार केला तर परिसरात असलेल्या त्यांच्या कार्याची लेखाजोखा व त्यांची शांतप्रिय वैचारीक विचारशैली अविस्मरणीय आहे. ते कधी कुणावर रागवत नाही. अगदी शांततेत येणाऱ्या प्रसंगाला हसत हसत सामोरे जातात. परीस्थीती समोर कधि हात टेकत नाही. तर चिकीत्सक वृत्तिने प्रसंगाना आव्हान देत असतात. याच सार्वगींक गुणाची पावती म्हणजेच दखल न्यूज चे ग्रामीण प्रतिनिधी ते दखल न्यूज भारतचे कार्यकारी संपादक आणी आज संपादक असा त्यांचा यशस्वी प्रवास होय. त्यांनी आपल्या लेखनितून सर्वसामान्य जनतेविषयी उत्तम असे लिखाण करून दखल न्यूज भारतच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम आदरणीय जनबंधू सर करीत आहेत. त्यामुळेच दखल न्यूज भारतने त्यांच्या कार्याची दखल घेऊन ते ग्रामीण प्रतिनिधी असतांनाच आरमोरी येथे पार पडलेल्या आढावा बैठकीत आ. संपादक प्रदीपजी रामटेके सर यांचे हस्ते स्मृतिचिन्ह प्रदान करुण जनबंधु सर यांचा गौरव करण्यात आला आहे.

जीवन जगत असतांना अनेक अडचणी निर्माण होत असतात. त्या अडचणी कशाप्रकारे हाताळायच्या आणि त्या अडचणीवर कशाप्रकारे मात करायचं तद्वतच जीवनात संघर्ष करून पुढे कसं जायचं याचे उत्तम उदाहरण म्हणजे आदरणीय जनबंधू सर, कारण त्यांनी आपल्या जीवनात संघर्ष करून स्वतःचे एक आदराचे, मानाचे, स्थान आपल्या निस्वार्थ भावणेतुन कार्यतत्परतेने जनमानसात निर्माण केले आहे. आणि त्याचीच एक पावती म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेऊन दखल न्यूज भारतच्या संपादक या पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आज संपादक पदाची धुरा योग्यरीत्या सांभाळत आहेत. त्यांचा हा यशस्वी जीवन प्रवास नेहमी आनंद द्विगुणित करून वाटचाल करीत राहो अशा वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा.
आयुष्याच्या या पायरीवर जनबंधु सर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहार येऊ द्या, तुमच्या इच्छा, आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ द्या, मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू द्या.
सर तुमच्या आयुष्याचा प्रवास या वळनावर आलेला असतांना आठवतायेत आजपर्यंत तुम्ही घेतलेले कष्ट, तुमची साधना आणि जगण्यातून सर्वसामान्यांच्या पुढे ठेवलेला आदर्श इथून पुढच्या आयुष्यात आपणास सुख समृद्ध जीवन लाभो हिच वाढदिवसा निमित्त मंगलमय मनोकामना.
आ सर तुमचा मनमोकळा स्वभाव आणि सगळ्यांची अगदी नितांत प्रेमाने वागण्याची पद्धत या दोन्ही गोष्टींमुळे तुमचा सहवास नेहमीच हवाहवासा वाटतो कुणाशीही अगदी विचाराचे मतभेद असणाऱ्या माणसाशी ही तुमची जिवलग मैत्री असते म्हणून तर लहानांपासून मोठ्यापर्यंत तुम्ही सगळ्यांचेच लाडके आहात..
अशा या उत्तुंग व्यक्तिमत्त्व, शांतप्रिय मनोधैर्याचे धनी असलेल्या आदरणीय प्रितम जनबंधू यांच्या लेखणीचे एक उत्तम उदाहरण म्हणजे त्यांना त्यांच्या लेखन कार्याविषयी मिळालेलं उत्तम आदर्श पत्रकार पुरस्कार, आणि विविध क्षेत्रात त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे मिळालेले पुरस्कार व त्यांच्या जीवन जगण्याची शैली सर्वांना सोबत घेऊन जाणारी आदर्शवत ठरावी अशीच आहे.

असे उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे आदर्शवत धनी ठरलेल्या आदरणीय संपादक प्रीतम जी जनबंधू सरांना अनंत पराकोटी च्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा.