मोहूर्ली ते मल्लेरा मार्गावरील दीना नदीच्या पात्रात आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह

142

 

संपादक जगदीश वेन्नम

गडचिरोली : तालुक्यातील मोहूर्ली ते मल्लेरा मार्गावरील दीना नदीच्या पात्रात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना आज उघडकीस आली.
श्रीनगर येथील एक इसम मासेमारी करण्याकरिता नदी पात्राकडे गेला असता त्याला सदर मृतदेह दिसल्यावर त्यांनी श्रीनगर येथील पोलीस पाटील यांना माहिती दिली. त्यानंतर श्रीनगर येथील पोलीस पाटील सौ. आशा मुजुमदार यांनी पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. व सध्या त्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. संबंधित मृतकाच्या हातावर अंकुश असे नाव गोदलेले असून त्याच्या अंगावर अंगावर लाल रंगाची फुल हाथाची टी-शर्ट, कथ्या कलर ची अंडर्विअर, उजव्या हाथवर लाल कलर ची राखी-धागा आहे. जर कोणालाही याबाबत किंवा कोणी घरून बेपत्ता असल्यास तात्काळ याची माहिती मुलचेरा पोलीस स्टेशन चे अधिकारी मिलिंद पाठक यांना 9823228972 या क्रमांकावर तात्काळ संपर्क करून द्यावी असे आवाहन मुलचेरा पोलीस स्टेशन तर्फे करण्यात आले आहे.