देसाईगंज युवक काँग्रेस तर्फे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांचा सत्कार

199

सत्यवान रामटेके(गडचिरोली उपजिल्हा प्रतिनिधी)
‘दखल न्यूज भारत’
गडचिरोली जिल्ह्याचे युवा नेतृत्व,तडफदार व्यक्तिमत्त्व,समाजाप्रती उत्कंठा असणारे,सर्वसामान्य नागरिकांचे हित जोपासणारे व शेतकरी बांधवांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी झटणारे महेंद्र ब्राम्हणवाडे यांची नुकतीच गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याने देसाईगंज युवक काँग्रेसतर्फे सत्कार करण्यात आला.
सत्कार प्रसंगी ब्राम्हणवाडे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना म्हटले की,पक्षातील अंतर्गत मतभेद बाजूला सारून एकजुटीने पक्ष वाढीसाठी,जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणे गरजेचे आहे.सर्व कार्यकर्त्यांनी घर-घर काँग्रेस एकच नारा गुंजवणे आवश्यक असल्याचे सांगितले.यानंतर काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉ.नितीन कोडवते यांचाही देसाईगंज युवक काँग्रेसतर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सत्कार प्रसंगी देसाईगंज युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष पिंकुंभाऊ बावणे,आरमोरी युवक काँग्रेसचे विधानसभाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे,युवक काँग्रेसचे कार्यकर्ते कमलेश बारस्कर,निलेश अंबादे,राहुल सीडाम,विवेक गावळे,अमन गुप्ता,सुनील चिंचोळकर, भूमीत मोगरे,आकाश शिवकर,गोपाल दिघोरे व इतर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.