उप पोलीस स्टेशन रेगुंठा तर्फे भव्य जनजागरण मेळावाचे आयोजन

111

 

संपादक जगदीश वेंनम

दिनांक 23/10/2021 रोजी उप पोस्टे रेगुंठा येथे पोलीस अधीक्षक अंकित गोयल सर. , अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे सर, अनुज तारे सर, समीर शेख सर, यांच्या संकल्पनेतून तसेच उप विभागिया पोलीस अधिकारी प्रश्नांत स्वामी सर यांच्या मार्गदर्शनाखाली *उप पोस्टे रेगुंठा* येथे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सदर जनजागरण मेळाव्यामध्ये *300 ते 450* नागरिक उपस्थित होते. सदर मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणुन प्राथमिक शाळा केंद्रप्रमुख रमेश पोलंमपल्ली, डॉक्टर चेतना दिल्पे, कृषी अधिकारी कोटनाके साहेब, वन अधिकारी राज जबोजी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, पोलीस पाटील, कोतवाल पोलीस ठाणे हद्दीतील अंगणवाडी सेविका, भगवंतराव शाळेमधील विद्यार्थी उपस्थित होते. तसेच माजी उपसभापती सत्यनारायण परपटलवार, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर मडावी, सरपंच सौ बेबीताई कोडापे, उपसरपंच रत्नाम शंकर, सरपंच सेनु कराडला, प्रतिष्ठानप्राथमिक शिक्षिका सौ सायली कुडके, भगवंतराव शाळा चे वरिष्ठ शिक्षक मिस्त्री सर, प्रतिष्ठित नागरिक शेखर पटनम, पूनम पटनम श्री लस्मय्या, श्रीनू चिल्कामारी, सतीश इंदुरी, तिरुमलेश वयलाला, नीरज गण्डूवार असे हजर असून सदर जनजागरण मेळावा दरम्यान कोरोना लसीकरण शिबिर चे आयोजन करण्यात आले होते. तसेच आयुष्यमान कार्ड, श्रम कार्ड, आरोग्य कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, जातीचे प्रमाणपत्र, पॅन कार्ड, रेशन कार्ड, डोमिसाइल सर्टिफिकेट, चे नोंदणी शिबिर चे आयोजन करण्यात आले होते परंतु नेटवर्क प्रॉब्लेम असल्याने फक्त नाव नोंदणी करून घेण्यात आलेली आहे
नमूद वैद्यकीय अधिकारी यांनी उपस्थितांना कोरोना बाबत जागृती करून लसीकरण घेणेबाबत प्रोत्साहन दिले तसेच आरोग्यविषयी काय काळजी घ्यावी याबाबतीत मार्गदर्शन केले.
सदर मेळाव्यामध्ये खालील लाभ देण्यात आला. 26 जॉबकार्डचे वाटप करण्यात आले ,कोरोना लसीकरण शिबीर दरम्यान हद्दीतील एकूण 25 नागरिकांना कोरोना चा डोस देण्यात आला,जात प्रमाणपत्र 12 वाटप केले, हद्दीतील नागरिकांची उज्वला मोफत गॅस योजना मार्फत 5 नागरिकांना वाटप करण्यात आले, उपस्थित सर्वांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी करून मोफत औषध वाटप करण्यात आले इत्यादी लाभ देण्यात आले तसेच नक्षल वाद्यांच्या कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडू नये किंवा त्यांना मदत करू नये याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
हद्दीतील 10 लोकांचे रेशन कार्ड काढून वाटप करण्यात आलेले आहे

उपस्थित महिलांना साडी, बादली,लुंगी, टफचे वाटप करण्यात आले.

सदर शिबीर दरम्यान उपस्थित नागरिकांना *पोलीस दादालोरा खिडकी* त्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. शिबिराला अतिदुर्गम भाग असलेल्या परसेवाडा चिकेला,दरसेवाडा, बोंद्रा इतर गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. त्यांनी सदर मेळावा आयोजित केल्याबद्दल गडचिरोली पोलीस दलाचे आभार मानले.
सदर शिबीर यशस्वी होण्याकरिता प्रभारी अधिकारी विजय सानप, पोउपनि सागर पाटील , पोउपनि श्री निजाम सय्यद ,जिल्हा पोलिस व SRPF अमलदारांनी संघभावनेने परिश्रम घेतले. सदर मेळाव्यात उपस्थित नागरिकांना भोजन देऊन मेळाव्याची सांगता करण्यात आली.