पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन केली मारहाण

176

 

हर्ष साखरे उपसंपादक

वणी: पत्नीला मानसिक व शारीरिक त्रास देणे पती व सासरच्या मंडळीला महागात पडले आहे. चिखलगाव येथील ही घटना आहे. पतीवर दारुच्या नशेत पत्नीला मारहाण करणे, तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिविगाळ करणे. घराबाहेर काढणे, मानसिक त्रास देणे इ. आरोप पत्नीने केले होता. या प्रकरणी पती, सासरे व सासूविरुद्ध विविध कलमानुसार वणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुचिता (बदललेले नाव) हिचां 2018 ला रितिरिवाप्रमाणे बीबी (नांदा) तालुका कोरपना येथे चिखलगाव येथील एका तरुणाशी विवाह झाला. सध्या तिला एक अडीच वर्षाचा मुलगा आहे. सुरवातीला सासरची मंडळी ही सुचिता सोबत चांगले राहत होते. परंतु हळूहळू त्यांच्या वागण्यात फरक पडायला लागला. सुचिताचे पती प्रफुल्लला दारू पिण्याची सवय आहे. त्यावरून तो पत्नीला नेहमी शिविगाळ व मारहाण करायचा.

यातच त्याने पत्नीला तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला अनेकदा घरातून हाकलून दिले. या कामात तिचे सासू सासरे देखील त्याच्या मुलाची साथ देत होते. तरी ती हे सहन करीत होती. 5 महिन्याची गर्भवती असताना तिचा गर्भपात करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. त्यानंतरही काही दिवस ती सासरी राहली. शेवटी या जाचाला कंटाळून ती 6 महिन्यांपूर्वी माहेरी आपल्या गावाला आली.

18 ऑक्टोबर रोजी पत्नी चिखलगाव येथे सासरी गेली असता तिला घरातील लोकांनी हाकलून दिले. ती माहेरी आली. तिने भावाला घडलेला सर्व प्रकार सांगितला. अखेर आज 22 ऑक्टोबर रोजी सुचिताचे आपल्या भावासोबत येऊन वणी पोलिसात तक्रार दिली. यापूर्वी त्यांच्यात समेट करण्याचा पांढरकवडा व चंद्रपूर येथील महिला समेट कक्षात झाला होता. परंतु काहीही फायदा झाला नाही.