नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार तहसीलदार सिद्धेश्वर वरणगांवकर यांनी स्वीकारला.

159

 

माहूर (प्रतिनिधी पवन कोंडे)

माहूर नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी विद्या कदम ह्या दीर्घकालीन रजेवर गेल्या आहेत.त्यांच्या रिक्त झालेल्या पदाचा अतिरिक्त पदभार तहसीलदार सिद्धेश्वर वरणगांवकर यांनी आज दि.10 ऑगस्ट रोजी स.11 वा. स्वीकारला.
मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार स्वीकारल्या नंतर कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी सुनील वाघ,गंगाधर दळवे,देवीदास जोंधळे,देवीदास सिडाम,भाग्यश्री रासवते,शे.मजहर,गणेश जाधव,शेखर पांडे,विजय शिंदे यांचेसह सर्व कर्मचारी उपस्थित होते.
पदभार स्वीकारताच तहसीलदार वरणगांवकर यांनी आंगनवाडी सेवीका संघटनेच्या तालुकाध्यक्ष सत्वशीला पंडित यांचेशी चर्चा केली.त्यानंतर माहूर शहरात बंद असलेले कोरोना सर्व्हेचे काम परत सुरू करत असल्याची माहिती पंडित मॅडम यांनी त्यांना दिली.