Home यवतमाळ छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिकांच्या जयघोषाने परिसर दनानले, कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी...

छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिकांच्या जयघोषाने परिसर दनानले, कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना करावी,वणी शहर शिवसेना व युवासेनेच्या वतिने निवेदन

151

वणी : परशुराम पोटे

कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती या गावातील शिवाजी महाराज यांचा आश्वरूढ पुतळा रात्रीच्या अंधारात हटविल्याने,वणी शहर शिवसेनेसह युवासेना आक्रमक झाली असुन येथिल शिवाजी चौकात कर्नाटक सरकारचा निषेध करीत येथिल उपविभागीय अधिकारी डाँ.शरद जावळे यांना निवेदन दिले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकासह तहसिल परिसरात ‘जय भवानी जय शिवाजींच्या जयघोषाने परिसर दनानला होता.
कर्नाटक राज्यातील बेळगाव तालुक्यातील मनगुत्ती या गावात शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा आहे कर्नाटक सरकारने राज्य मार्गाचे काम हाती घेतले आहे त्यामुळे रात्री अंधाराचा फायदा उचलुन पुतळा हटविण्यात आला कर्नाटक सरकारने केलेल्या या कृत्याचा सर्वत्र निषेध व्यक्त केल्या जात असतांना याचे पडसाद वणीतही उमटले आहे. शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिपक कोकास,सुनिल कातकडे, वणी शहर प्रमुख राजु तुराणकर व युवासेना वणी तालुका चिटनिस अजिंक्य शेन्डे यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिक येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ एकत्रित आले. यावेळी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हारार्पन करण्यात आले.
यावेळी वणी शहर शिवसेनेसह युवासेना सैनिकांनी कर्नाटक सरकारच्या विरोधात ‘जय भवानी जय शिवाजी’ या घोषवाक्यांनी परिसर दणानुन सोडला व जोरदार नारेबाजी केली. यावेळी सुरेश देशकर,सौ.किर्तीताई देशकर वणी शहर महिला संघटीका, ललित लांजेवार ,मुन्ना बोथरा, मोन्टु वाधवानी माजी शहर प्रमुख, बालु तुराणकर, मंगल भोंगळे,रामचंद्र वाभिटकर,जनार्दन येटे, बंडु सराफ,निखिल देरकर, मंगेश मेश्राम, पुरुषोत्तम घोगरे, मंगेश नैताम, विनम्र कुईटे, महेश तराळे, किशोर ठाकरे, राजेश तराळे, आशुतोष तेलंग, दिनेश सोयाम,मिलींद बावने, गुड्डु घाटोळे, सागर खडसे,साहिल पाटील, गौरव दयकर, गौरव देशमुख, अथर्व भोयर, नैनिष हनमंते, क्रुष्णा वांढरे, तुषार येसेकर, हर्षल मालेकर, सौरभ वानखेडे, सागर जाधव यांचेसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते

Previous articleतळेगाव ग्राम सेवकाचा गावा सोयीकडे दुर्लक्ष (मुख्यालयी राहण्याची सक्ती करण्यात यावी) ग्रामस्थ राकेश सहारे यांची मागणी
Next articleनगर पंचायतीच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार तहसीलदार सिद्धेश्वर वरणगांवकर यांनी स्वीकारला.