तळेगाव ग्राम सेवकाचा गावा सोयीकडे दुर्लक्ष (मुख्यालयी राहण्याची सक्ती करण्यात यावी) ग्रामस्थ राकेश सहारे यांची मागणी

152

कुरखेडा /राकेश चव्हाण प्र

कुरखेडा नजीक दोन किलोमीटर च्या अंतरावर असलेल्या तळेगाव ग्रामपंचायत अधीनस्थ कार्यरत असलेल्या ग्रामसेवकाचा गावातील सोयी सुविधांकडे दुर्लक्ष होतं आहे, पावसाळा लागल्यानंतरही अद्याप गावातील नाल्यांची गाळ उपसून सफाई करण्यात आलेली नाही त्या मुळे मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे नाल्यांमधून पाणी भरून वाहताना व ते नाली तील पाणी गावकऱ्यांच्या घरात जमा झाल्यामुळे लोकांचे सामान भिजल्यामुळे ग्रामस्थांना त्रास होत आहे •सध्या कोविंड 19 महामारी चा प्रादुर्भाव व सोबतच गावात पाणी नाल्यांमध्ये साचून असल्याने व योग्य विल्हेवाट होत नसल्यामुळे डासांचा व इतर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही आज सकाळी पड्लेल्या जोरदार पावसाने ग्रामस्थाच्या घरात पाणी शिरल्याने ग्रामसेवक सह संपर्क साधला असता व त्याना परिस्थिति सांगीतली असता कर भरत नसल्याचा कारण दाखवत नाली न सफाई केल्याचे सांगितले तरी ग्रामपंचायतीच्या इतर फंडातून संपूर्ण गावातील नाली सफाई करण्यात यावी व इतर रोग पसरु नये या करिता उपाय योजना करन्यात यावी अशी मागणी तळेगाव येथील राकेश सहारे व ग्रामस्थांनी केलेली आहे सदर ग्रामसेवक हे बाहेर जिल्ह्यातून येणे-जाणे करून नोकरी करीत असल्या मुळे त्यांना मुख्यालयही ही राहण्याची सक्ती करण्यात यावी•