गुडाळ ग्रामपंचायतीच्या प्रशासक पदी एन .आर पाटील यांची निवड .

 

प्रतिनिधी / उदय कांबळे

गुडाळ ता . राधानगरी येथील ग्रामपंचायतीच्या प्रशासक पदी राधानगरी पंचायत समिती बांधकाम विभागाचे शाखा अभियंता एन .आर. पाटील यांची निवड झाली . पाटील यांनी ग्रामपंचायतीचा कार्यभार स्विकारला असून त्यांना मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९९८ मधील तरतुदीनुसार सरपंच पदाचे सर्व अधिकार व कर्तव्य प्राप्त झाले आहेत .
कोविड १९ महामारीच्या पाश्र्वभूमिवर माहे ऑगस्ट २०२० अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्यामुळे निवडणूका होईपर्यत प्रशासक म्हणून शासकीय प्रतिनिधीची निवड करण्यात येते .
गुडाळ ग्रामपंचायतीची दिनांक ७ ऑगस्ट २०२० रोजी मुदत संपल्याने सदर ग्रामपंचायतीच्या प्रशासक पदी पाटील यांची निवड करण्यात आली .
यावेळी भोगावती साखर कारखाना माजी संचालक व तंटामुक्त अध्यक्ष एम .डी. कोथळकर यांच्या हस्ते पाटील यांचा सत्कार करण्यात आला . याप्रसंगी भोगावती साखर कारखाना विद्यमान संचालक ए .डी. पाटील , माजी सरपंच अजिंक्य हुजरे , माजी सरपंच अभिजीत पाटील , गोकुळ सहाय्यक दुध संकलन अधिकारी आशिष पाटील, माजी उपसरपंच संजय मोहिते , माजी उपसरपंच आर .के. पाटील , ग्रामसेवक उत्तम बरकाळे ,सुनिल पाटील , के.आर. पुंगावकर उपस्थित होते .