विद्यमान आमदार प्रकल्पाचे प्रमुख सल्लागार असूनही हिंदुह्र्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान गायब कसे? (विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांचा सवाल)

25

 

दिनेश बनकर कार्यकारी संपादक

मुंबई :- ओमकार दर्शन गुंदवली एसआरये रहिवाशी गृहनिर्माण संस्था (मर्या) गावठाणात होऊ घातलेल्या प्रकल्पाचे प्रमुख सल्लागार विद्यमान आमदार रमेश लटके असतानाही विकासकाने हिंदुह्र्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान गायब कसे असा सवाल आरटीआय ऍक्टिव्हिस्ट डॉ. राजन माकणीकर यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे विचारला.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर पुढे म्हणाले की, अंधेरी पुर्वेला गुंदवली परिसरात सीटीएस क्र ८६,/१ ते ७६, २०७ ए (पार्ट) २०७ ऐ /५ ते ३० गुंदवली गावठाण येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील विकासक आणि कार्यकारी समिती सदस्यांच्या भोंगळ मनमानी व भ्रष्ट कारभारा मुळे असंख्य प्रश्न निर्माण झाले असून उद्यान व मंदिराची जागा गडप करण्यात आली असल्याची माहिती नुकतीच मिळाली असून या प्रकरणी रिपाई डेमोक्रॅटिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

कमिटी च्या प्रमुख सल्लागार पदी सेनेचे स्थानिक आमदार रमेश लटके असूनही या प्रकल्पात विकासकाकडून नागरिकांच्या पुनर्वसनासह मंदिर, मैदान व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान बांधून देण्याचे ठरले होते मात्र आता चक्क उद्यानाची जागाच गडप केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असून काही झाले तरी हिंदू अस्मिता हिंदुह्र्दय सम्राट बाबासाहेब ठाकरे उद्यान नियोजित जागीच उभारणार अन्यथा विकासक शासन प्रशासन व स्थानिक आमदाराच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारू असा सणसणीत इशारा विद्रोही पत्रकार डॉ. माकणीकर प्रसिद्धी माध्यमाद्वारे दिला आहे.