मौजा रानकट्टा येथे जागतिक मुलनिवासी आदिवासी दिवस साजरा करण्यात आली.

0
86

 

रानकटा:/रानकट्टा येथील गाव पुजारी यांच्या हस्ते ध्वजारोहण व परंपरागत स्वरूपात पुजा पाठ करून जागतिक मुलवंशी दिन साजरा करण्यात आली.
थोडक्यात त्यांनी भाषणाचा मध्यमतून हे गोष्टी सांगितले।
संयुक्त राष्ट्र संघाने 1993 साली 9 ऑगष्ट जागतिक मुलनिवासी(आदिवासी) दिवसाची घोषणा केली. या मागिल पार्श्वभूमी अशी आहे कि, कोलंबस या युरोपियन नेत्यांनी अमेरिकेवर कब्जा करण्याला 500 वर्ष पुर्ण झाल्याचा निमित्ताने विजयोत्सव साजरा करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघामध्ये 1982 ला आणला होता. त्याला आफ्रिका, लँटीन अमेरिका व अन्य देशानी जोरदार विरोध केला होता. हा विरोध न्यूयॉर्क येथे रैली, मोर्चा काढून या देशानी कड़ाडून प्रतिकार केला. कारण कोलंबस ने दक्षिण अमेरिके मध्ये पाया ठेवला ही इतिहासातील घटना मानवतेला लाजवणारी अमानवीय अत्यंत क्रूर घटना आहे. कोलंबस याने त्या काळी अमेरिकेतील एक कोटी रेड इंडियन मुलनिवासी आदिवासींची हत्या करुण त्यांच्या भूमीवर कब्जा केला होता. त्याने महिला, पुरुष, म्हातारे व लहान मुले या सर्वांची क्रुरपणे हत्या केली होती. हजारोंना कैद करुन गुलाम बनविले होते. 14 व्या शतकापासून दक्षिण अमेरिकेत असलेल्या मुलनिवासी कबिलाई राज्यांना नष्ट करुन कब्जा केला. अशा आक्रमणकारी क्रुर व्यक्तीचे शताब्दी वर्ष साजरे करण्याच्या प्रस्तावाचा विरोधात जगातील मुलनिवासींनी एकजूट दाखवून या प्रस्तावाला खारिज केले. ही कोलंबसची विजय यात्रा नसुन अमेरिकी मुलनिवासीना युरोपियन पराधीनतेच्या बेड़्यामध्ये जकडण्याचा दिवस संबोधले. संयुक्त राष्ट्र संघाने युरोपियन देशाचा प्रस्ताव नाकारला. युरोपियन देशांचा दक्षिण अमेरिका व अमेझॉनची राजधानी पनामा येथे कोलंबसचा विजयोत्सव साजरा करण्याला धुड़कावून लावीत, जगातील मुलनिवासी एक व्हा! असा प्रस्ताव आणला व तो यु.एन.ओ. द्वारे मान्य केला गेला. संयुक्त राष्ट्र संघाने 9 ऑगष्ट 1993 ला जागतिक मुलनिवासी दिवस म्हणून घोषित केला. अशाप्रकारे 9 ऑगष्ट हा दिवस विस्थापित करण्याऱ्यांच्या विरोधातील संघर्षाचे प्रतिक म्हणून स्थापित झाला. विशेष बाब ही आहे की, संयुक्त राषा संघाने ज्यावेळी जगातील प्रत्येक देशाला त्या देशातील मुलनिवासींची किती संख्या आहे, हे कळविण्यात सांगितले त्यावेळी भारत सरकारने आमच्या देशात कोणीही मुलनिवासी नाही असा अहवाल रिपोर्ट संयुक्त राष्ट्र संघाला दिला होता.म्हणजे भारत सरकारने आदिवासींचे अस्तित्वच नाकारले होते.
9 ऑगस्ट हा मुलवंशी(आदिवासी) दिवस साजरा करणे म्हणजे आदिवासींच्या अस्तित्वासाठी व अस्मितेसाठी संघर्ष करणे होय.कोलंबसने केलेल्या तत्कालीन हत्याकांड पासून तर आज पर्यंत जगामध्ये तत्कालीन सरकारांनी कोट्यवधी आदिवासी (मुलनिवासी) जनतेची विस्थापन व हत्या केली आहे. ज्यात मोठ्या संख्येने आदिवासी आहेत.भारतातही वेगवेगळ्या प्रकल्पामुळे आजवर 3 कोटीपेक्षाही जास्त लोक विस्थापित केल्या गेले आहेत. 60% आदिवासी जनता आहे.विस्थापितांचे पुनर्वसन मात्र प्रचार असते पण आजवर विस्थापित केलेल्या पैकी 10% लोकांचेही पुनर्वसन बरोबर केल्या गेले नाही ही बाब आपन नेहमी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. आज आपल्या जिल्ह्यामध्ये देखील विस्थापनाची टांगती तलवार आपल्या मानेवर आहे. सुरजागड़ ते आगरी पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी लोहप्रकल्प ,अभयारण्य तसेच चव्हेला सारखे अन्य मोठे बांधप्रकल्प आणल्या जात आहे. विकासाच्या नावावर येणारे हे प्रकल्प वास्तविक पणे आदिवासींच्या विनाशासाठी कारणीभुत ठरणार आहेत. यामुळे जल,जंगल,जमीन व आदिवासींच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे. आपण सगळे पेसा कायदाची अंमलबजावणी झाली पाहिजे. या करिता आपण सगळे तेंदूपत्ता व बांबूचे रेट मिळविण्याकरिता एकजुटीने संघर्ष केलोन असाच प्रकारे रेट बाबतीत शेवटपर्यंत चांगला लढा देत रहू. ग्रामसभेला वनउपजाचा मालकी हक्क मिळावा ह्याकरिता देखिल एकजुटीने संघर्ष केलेला आहे. परंतु एवढ्यावरच थांबणे योग्य होणार नाही तर ग्रामसभेला वास्तविकपणे गाव समाजाची सभा बनविणे गरजेचे आहे.आपणास माहिती आहे की, ग्रामसभाकरीता झालेल्या संघर्षामध्ये किती अडचणींना तोंड द्यावे लागले व किती शासन प्रशासन कडून अनेक समस्यांना समोरे जावे लागले. आपल्याला एकीकडे हक्क देण्याचा देखावा करतात तर दुसऱ्या बाजूने ते काढून घेण्याची पुर्ण तयारी करतात हा डबल शासन प्रशासनाच्या गेम आपण समजले पाहिजे. हक्क मिळविणे जवढे कठीण. त्याहून ते ठिकावून ठेवणे कठीण आहे. एकजुटीला आणखी मजबूत करित कोणत्याही कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार रहावे लागेल. आपला विकास सर्वांगीण दृष्टीकोनातून झाली पाहिजे. आरोग्य व शिक्षणाच्या सोई सुविधांची फारच दयनीय अवस्था आपल्या जिल्ह्यात आहेत. पुढारलेल्या सत्ताधारी केंद्र व राज्य सरकार जाणिवपूर्वक आपल्याला मागे ठेवण्याचा कोणत्याही कसर बाकी ठेवत नाही.शासन प्रशासनाकडून अन्याय अत्याचार चालतच असतो ही सर्व परिस्थिती आपल्याला आम्ही कार्यक्रमाच्या मध्यमतून ओरडून ओरडून सांगत असतो. जर आपण संघटितपणे लढा दिला नाही, तर आपले अस्तित्व नष्ट झाल्याशिवाय रहणार नाही. अशा प्रकारे गावातील गाव पुजारी सांगितले. उपस्थित गावातील प्रतिष्ठित नागरिक,महिला, पुरुष व गावची शाळेतील मुले उपस्थित होते