कोराडी २१० मेगावॉट प्रकल्पातील जुनी चिमणी पडतांना भीषण अपघात १ जण गंभीर जखमी, तर २ जण किरकोळ जखमी असल्याची चर्चा

1109

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

कोराडी / नागपुर : १० आँगस्ट २०२०
नागपुर जिल्ह्यातील कोराडी औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या २१० मेगावॉट प्रकल्पातील युनिट १,२ ची चिमणी डिसमेंटल करण्याचे कार्य सुरू असतांना भीषण अपघात झाला असुन या अपघातात एक कंत्राटी मजुर यांचे डोक्याला गंभीर दुखापत झाली असुन इतर २ जण किरकोळ जखमी झाले असल्याची चर्चा आहे.
प्राप्त माहितीनुसार जुन्या वीज प्रकल्पातील चिमणी पाडण्यासाठी आवश्यक ती काळजी ना घेतल्यामुळे च हा अपघात झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या चिमणी ला जेसिबी च्या मदतीने तिला पाडण्याचे काम एका कंपनीला दिले होते. ही चिमणी पडतांना अडोरे कंपनी चे कंत्राटी कामगार दिनु काकडे वय ५० वर्ष यांच्या डोक्याला सिमेंट कांक्रीट चे तुकडे उडुन ५०० फुट अंतरावर लागले असे प्राप्त माहितीनुसार कळते. तसेच या अपघातात एक इंजीनियर व टेक्निशियन पण यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत अशी माहिती आहे.मात्र या संदर्भात कोणता गुन्हा वगैरे दाखल झाला नसल्याचे कळते.
या अपघातात जखमी कामगारास महाजेनको अंबुलंस ने नागपूर च्या अलेक्सिस हाँस्पिटल ला उपचारासाठी भर्ती केले आहे. तर इतरांवर किरकोळ उपचार करुन सुट्टी मिळाली आहे. एक चिमणी पाडल्यानंतर आता परत दुसरी चिमणी पाडण्याचे कार्य सुरु असल्याची माहिती आहे. आता यावेळी कोणती दुर्घटना होऊ नये बस्स..