अन…..मुलाने केले बापाला वाघाच्या तोंडातून सुटका

212

 

हर्ष साखरे उपसंपादक

पोंभूर्णा:- पोंभूर्णा वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येणाऱ्या चिंतलधाबा बिटातील शेतशिवारा नजीक पट्टेदार वाघाने एका शेतकऱ्यावर हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. वाघाने चढवलेल्या हल्ल्या दरम्यान बाजुला असलेल्या मुलाने आपल्या बापाला वाघाच्या जबड्यातून वाचवून सुटका केली आहे.

वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येणाऱ्या चिंतलधाबा बिटातील कक्ष क्रमांक ९७ वनक्षेत्रातील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शेतात बसून गजानन शिवराम मोरे वय (५५) रा. चिंतलधाबा हा शेतात गुरे चारत असतांना झुडपाखाली दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने त्याचावर हल्ला चढवला. दरम्यान बाजुलाच बकऱ्या चराई करीत असलेल्या मुलाने आरडाओरड करून व भिती दाखवून वाघाला पळवून लावलं. व मुलाने बापाला वाघाच्या जबड्यातून वाचविले.
घटनेची माहिती मिळताच गावकरी व वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

जखमीला तात्काळ पोंभूर्णा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र गंभीर जखम असल्याने त्यांना तात्काळ चंद्रपूर ला उपचारासाठी पाठविण्यात आले.
सदर घटनेचा पंचनामा करून पुढील तपास वनविभाग करीत आहे.

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी आम्रपाली खोब्रागडे, वनक्षेत्र अधिकारी आनंदराव कोसरे,चिंतलधाबा बिट वनरक्षक राजेंद्र मेश्राम,केमारा बिट वनरक्षक शितल कुळमेथे, वनमजूर माणिक आत्राम, किशोर धोडरे,संजू जंबुलवार , सरपंच शुभांगी कुत्तरमारे,वनसमिती अध्यक्ष देवराव भांडेकर, भुजंग पेंदोर घटस्थळी उपस्थित होते.