मा. विद्याधर कांबळे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

26

 

प्रतिनिधी : गौरव मुळ्ये.

रत्नागिरी : जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून देण्यात येणारा सण 2021 22 च्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा आज रत्नागिरी जिल्हा परिषद कै. श्यामराव पेजे सभागृहात पार पडला. विविध क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या जिल्ह्यातील 10 शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

रत्नागिरी तालुक्यातून जिल्हा परिषद शाळा लाजुळ येथे कार्यकर्ता असणारे तसेच हातखंबा गावचे आदर्श व्यक्तिमहत्व मा. विद्याधर कांबळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मा. इंदुराणी जाखड , शिक्षण सभापती मा. चंद्रकांत मणचेकर , तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण प्राचार्य डॉ. गजानन पाटील यांच्या हस्ते कांबळे यांना शाल, श्रीफळ, मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव होते. तसेच जिल्हा परिषद CEO इंदुराणी जाखड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने , जिल्हा परिषद समाज कल्याण समिती सभापती परशुराम कदम, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती भारती सरवनकर, जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती रेश्मा झगडे , जिल्हा परिषद अति. मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, कोकण विभागीय अध्यक्ष सुरेश आवारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण गजानन पाटील, शिक्षणाधिकारी मा. वाघमोडे मॅडम , जिल्हा परिषद सदस्य महेश म्हाप , सदस्य आबा आडिवरेकर, सरपंच प्रवीण पांचाळ आदी उपस्थित होते.

या पुरस्कार वितरण सोहळ्याला खास कुटूंबीय शुभांगी चित्रक सावंत ,चित्रक गणपत सावंत,
अनंत धोंडू सावंत गुरुजी,
राजेंद्र शिवाजी कांबळे, शाळा लाजूळ नं १ चे मुख्याध्यापक दिलीप रामा वळवी हे देखील उपस्थित होते.

दखल न्यूज भारत