निलज नाल्यावरुन पुरात वाहून गेलेल्या दोघापैंकी एक बेपत्ता

 

बिंबिसार शहारे
दखल न्युज

देवरी: दि.10ः- देवरी तालुक्यातील खामखूरा- निलज मार्गावर असलेल्या निलज नाल्यावरील पुलावरून पाणी जात असतानाही रविवारला रात्रीच्या वेळेस अरविंद पंढरी सहारे (वय 35) व संजय पांडे दोघेही राहणार चिचगड पुलावरुन गाडी नेण्याच्या प्रयत्ना वाहून गेल्याची घटना घडली.या दोघा मित्रापैकी संजय पांडे याने झाडाला पकडून आपला जिव वाचविला.मात्र अरविंद सहारे हा पुरात वाहून गेला असून अद्यापही त्याचा कुठेच शोध लागलेला नाही.आपत्ती निवारण व्यवस्थापनाच्यावतीने अरविंदचा शोध घेण्यासाठी शोध पथक रवाना करण्यात आल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी दिली आहे.