जागतिक आदिवासी गौरव दिन ‘आदिवासी विकास मंथन दिवस’ म्हणून साजरा व्हावा-प्रकल्प अधिकारी चौधरी

0
96

 

प्रतिनिधी
राहुल उके
दखल न्यूज भारत

देवरी,दि.10:-दरवर्षी जागतिक आदिवासी गौरव दिन आपण मोठ्या जल्लोषात खुल्या मैदानात साजरा करत असतो. परंतु कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता आपण हा दिवस छोट्या पध्दतीने साजरा करतोय. आदिवासी गौरव दिन साजरा करत असताना आदिवासी जमातीच्या वैचारिक जडण-घडणीसाठी आणि त्यांचा सर्वांगीण विकासासाठी हा दिवस ‘आदिवासी विकास मंथन दिवस’ म्हणून साजरा करण्यात यावा, असे मत प्रकल्प अधिकारी जितेन्द्र चौधरी यांनी व्यक्त केले.
९ ऑगस्टला जागतिक आदिवासी गौरव दिन आदिवासी प्रकल्प कार्यालयात साजरा करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.आदिवासी गौरव दिनाच्या कार्यक्रमात प्रकल्प अधिकारी जितेन्द्र चौधरी यांनी आदिवासी समाजाचे दैवत बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करुन कार्यक्रमाला सुरुवात केली.कार्यक्रमाप्रसंगी आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे एच.आर.सर्याम(सहा.प्र.अ.),पी.जी.काळे(कार्यालय अधिक्षक),व्ही.एस.टेभुंर्णीकर(स.प्र.शिक्षण),जी.एस.बडवाईक, सौ.खोटेल (स.प्र.अ.),शिवाजी तोरकड,दिनेश कुभांरे व आदिवासी प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.