मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळ आरमोरी जि.गडचिरोली येथील संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय किशोरभाऊ वामनरावजी वनमाळी साहेब यांचे हृदय विकाराने दुःखद निधन

194

 

हर्ष साखरे ता प्रतिनिधी आरमोरी

आरमोरी

आज दि 10/8/2020 ला सकाळी 8.15 वाजता हृदय विकाराने दुःखद निधन झाले. वनमाळी साहेबांनी संस्थेला आपल्या अध्यक्ष काळात संपुर्ण योगदान दिले.,अतिशय अनुभवी, मनमिळावू,अतिशय शिस्तप्रिय ,शांत स्वभावाचे धनी असलेले किशोरभाऊ अचानक निघून गेल्याने संस्थेत न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली. संस्थेला व त्यांच्या परिवाराला त्यांच्या जाण्याने जे दुःख झाले त्या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर त्यांच्या परिवाराला,कुटुंबाला देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना परमेश्वर त्यांच्या आत्म्यास आपल्या चिरशांतीत सामावून त्यांना शांती देवो हीच नम्र प्रार्थना यावेळी मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळ चे उपाध्यक्ष नुर अली भाई पंजवानी ,सर्व संचालक मंडळ व या संस्थेद्वारा संचालित सर्व विध्याशाखांच्या वतीने स्वर्गीय किशोरभाऊ वनमाळी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.